शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात नकली सोने प्रकरणी गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 12:33 IST

जळगाव : एक किलो वजनाचे नकली सोन्याचे मनी व माळा देऊन निखिल कचरुलाल जोशी (रा.जयकिसनवाडी) यांची दोन लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गोपाल नावाच्या तरुणासह त्याच्यासोबत असलेल्या अज्ञात व्यक्तीविरुध्द सोमवारी शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जोशी यांचे सुभाष चौकात स्टॅँडर्ड मद्रास रेस्टॉरंट अ‍ॅण्ड कोल्ड्रींक्स नावाचे हॉटेल आहे. त्यांच्याकडे गेल्या ...

जळगाव : एक किलो वजनाचे नकली सोन्याचे मनी व माळा देऊन निखिल कचरुलाल जोशी (रा.जयकिसनवाडी) यांची दोन लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गोपाल नावाच्या तरुणासह त्याच्यासोबत असलेल्या अज्ञात व्यक्तीविरुध्द सोमवारी शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जोशी यांचे सुभाष चौकात स्टॅँडर्ड मद्रास रेस्टॉरंट अ‍ॅण्ड कोल्ड्रींक्स नावाचे हॉटेल आहे. त्यांच्याकडे गेल्या तीन ते चार दिवसापासून दोन तरुण येत होते. आम्ही जीर्ण इमारत तोडण्याचे काम करतो. हे काम करीत असताना आम्हाला सोन्याचे मनी सापडले आहेत. तुम्हाला कमी किमतीत हे मनी देतो असे सांगून तीन दिवस जोशी यांच्यामागे तगादा लावला. मोहाला बळी पडून जोशी यांनी रविवारी दोन लाख रुपयात मनी खरेदी केले. त्यातील एक मनी सराफाकडून तपासून पाहिला असता तो खरा होता. ते दोघं जण रोकड घेऊन गेल्यानंतर जोशी यांनी अन्य मनी व माळ तपासली असता ती बनावट निघाली. फसवणुकीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर रविवारी जोशी यांनी शहर पोलीस स्टेशन गाठून तक्रार अर्ज दिला. त्यानंतर सोमवारी अज्ञात व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, या दोन्ही तरुणांनी सराफ बाजारात आणखी काही दुकानात जावून मनी दाखविल्याची माहिती मिळाली आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक आशिष रोही करीत आहेत.

टॅग्स :Crimeगुन्हाJalgaonजळगाव