शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

जळगावच्या साडी व्यापाऱ्याच्या कारच्या रस्तालूूट प्रकरणी अखेर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2018 19:02 IST

रावेर पोलीस पथक मध्य प्रदेशात रवाना

रावेर, जि.जळगाव : जळगाव येथील साडीच्या घाऊक व्यापाºयाच्या नोकरास कारमधून लुटल्याप्रकरणी तपासासाठी पोलीस पथक मध्य प्रदेशात रवाना झाले आहे.जळगाव येथील बळीरामपेठेतील सीमा शिल्क या साड्यांचे घाऊक व्यापारी राजकुमार मोटनदास नाथाणी (रा.सिंधी बस्ती, जळगाव) यांच्या विक्री केलेल्या साडीच्या मालाची बºहाणपूर येथील कापड दुकानदारांकडून थकीत रकमेची वसुली करण्यासाठी त्यांचा नोकर नाथुसिंग मोटूसिंग छोटूसिंग मेडतियाँ (राबोठडा, अजमेर, राजस्थान, ह.मु.राधाकृष्ण नगर, जळगाव) व कारचालक गणेश निंबा पाटील (रा.ममुराबाद, ता.जळगाव) हे गेले होते. संबंधित कापड दुकानदारांकडून त्यांनी वसुली करून ते त्यांच्या कार (एमएच-१९-बीयू-४४२६) ने परतीच्या प्रवासाला जळगावकडे निघाले. दरम्यान, खानापूर ते कर्जोद दरम्यान असलेल्या रावेर तालुका सहकारी साखर कारखान्याच्या आवारातील काटेरी झुडपांच्या समोर सन्नाटा असल्याची संधी साधून कारचा पाठलाग करत आलेल्या व तोंडावर कापडे बांधलेल्या दोन धिप्पाड व उंच अशा अज्ञात चोरट्यांनी चालकाच्या खिडकीतून त्याच्या तोंडावर अंडे व त्यावर मिरची पुड फेकून तथा मोटारसायकल कारपुढे आडवी लावली. त्यांच्या हातातील लांब सुºयाच्या साह्याने हल्ला केला असता चालक गणेश निंबा पाटील याने प्रतिकार केला. त्याच्या डाव्या हाताच्या मनगटाला इजा झाली.दरम्यान, क्लिनरसाईडने बसलेल्या वसुली कर्मचाºयाने हा थरार पाहून कारमधील मागच्या सीटवर उडी मारून चालकाच्या आसनामागे लपण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याच्याही अंगावर मिरची पुड फेकून त्याच्या हातातील ८१ हजार रुपये रोकड व अंदाजे एक लाखाचे धनादेश असलेली बॅग, कारच्या चाव्या दोघांचे मोबाइल हिसकावून रस्तालूूट करत पोबारा केला.ही थरारक घटना शनिवारी रात्री अवघ्या सव्वा नऊ वाजेच्या सुमारास घडली.दरम्यान, संबंधित व्यापारी जळगावहून रावेर पोलिस ठाण्यात दाखल झाल्यानंतर त्यांचे दोन्ही नोकर प्रामाणिक असल्याचा विश्वास त्यांनी प्रकट केल्याने, त्यांचा नोकर मोटूसिंग छोटूसिंग मेडतियाँ यांच्या फिर्यादीवरून रावेर पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध रस्तालुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान, रात्री घटनास्थळी फैजपूर पोलीस उपअधीक्षक राजेंद्र रायसिंग, सहायक पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील, फौजदार दिपक ढोमणे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलीस उपअधीक्षक राजेंद्र रायसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी फौजदार दीपक ढोमणे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथक मध्यप्रदेशात रवाना केले आहे. पुढील तपास फौजदार जाधव करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRaverरावेर