शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
2
काय आहे 'सलवा जुडूम' ?; ज्यावरून अमित शाहांनी विरोधकांच्या उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराला घेरले
3
AI ची कमाल, आता म्हातारपणही रोखणार, राहाल "चिरतरुण"! काय आहे चॅटबॉट रिव्हर्स एजिंग? जाणून घ्या
4
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
5
ओला इलेक्ट्रिकच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी; नीति आयोगाच्या वृत्ताचा परिणाम, तुमच्याकडे आहे का?
6
Pune: सिंहगडावरून बेपत्ता झालेला गौतम गायकवाड पाच दिवसांनी सापडला; कुठे होता, पोलिसांनी काय सांगितलं?
7
"मी कुणाच्या वाट्याला जात नाही आणि..." अजित पवारांनी घेतली संकर्षण कऱ्हाडेची फिरकी
8
अमेरिका ७, चीन ४, भारत १.., ही कोणती यादी, जिथे फक्त दोनच दिग्गजांचं आहे वर्चस्व; यातून काय मिळताहेत संकेत?
9
लहान गुंतवणुकीतून कोट्यधीश होण्यासाठी SIP का आहे बेस्ट? 'हे' ८ मुद्दे ठरतात गेमचेंजर
10
गर्लफ्रेंडशी शरीरसंबंध प्रस्थापित करताना पुरूषाचा मृत्यू, कोर्टाने प्रेमिकेला ठोठवला दंड
11
वराह म्हणजे डुक्कर नाही, तर ते यज्ञरूप आहे; वराह जयंतीनिमित्त जाणून घ्या विष्णूंचे अवतारकार्य
12
Viral: रीलचा नाद जीवावर बेतला; २२ वर्षीय युट्यूबर धबधब्यामध्ये बुडाला, घटनाकॅमेऱ्यात कैद
13
गुडन्यूज! परिणीती चोप्रा होणार आई, लग्नाच्या दोन वर्षांनंतर कुणीतरी येणार येणार गं...
14
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!
15
एक मुलगा छातीवर बसला, दुसऱ्याने हात-पाय बांधले; रिटायर्ड DSP ना मारहाण; हिसकावलं ATM
16
चौथ्या स्टेजच्या कर्करोगाशी झुंजतेय अभिनेत्री तनिष्ठा चॅटर्जी, तिला सतावतेय ९ वर्षांच्या मुलीची चिंता
17
Prithvi Shaw : संघ बदलला अन् फार्मात आला! पृथ्वी शॉच्या भात्यातून आली आणखी एक कडक खेळी
18
Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
19
हरितालिका व्रत २०२५: ‘हे’ नियम अवश्य पाळावेत; व्रत पूजनानंतर म्हणावी हरितालिका आरती
20
१० वेळा बॉयफ्रेंडसोबत पळाली, आता विवाहित महिलेने ठेवला १५-१५ चा अजब फॉर्म्युला; ऐकून सगळेच हैराण

४५ लाखांचे अनुदान हडपल्याच्या प्रकरणात संशयित मोकाटच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 11:36 IST

नऊ महिने बेकायदेशीर चालले केंद्र

ठळक मुद्दे गुन्हा दाखल झाल्यानंतर पाठविला मान्यतेचा प्रस्ताव; न्यायालयाने फेटाळले होते अटकपूर्व

जळगाव : खोट्या सह्या व ठराव करुन शासनाचे ४५ लाख रुपये अनुदान लाटल्याच्या प्रकरणात न्यायालयाने काही संशयितांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे, तरी देखील पोलिसांनी अद्याप एकाही संशयिताला अटक केलेली नाही. एरव्ही अनेक गुन्ह्यात आरोपी अटकेची घाई करणारी यंत्रणा या प्रकरणात बोटचेपी भूमिका का घेत आहे? असा प्रश्न तक्रारदारांना पडला आहे.महाबळ परिसरातील निमजाई फांऊडेशनचे भूषण गणेश बक्षे, शीतल भगवान पाटील यांनी खोट्या सह्या करुन मयुरेश्वर स्कुल आॅफ कॉम्प्युटर एज्युकेशन या संस्थेचे बनावट कागदपत्रे तयार केले तसेच सदस्य भरत अरविंद भंगाळे, मोहिनी भरत भंगाळे, भगवान दगडू पाटील, राजेश नरेंद्र नारखेडे यांनीही खोटा ठराव करुन शासनाचे ४५ लाख रुपये अनुदान लाटल्याचा गुन्हा दीड महिन्यापूर्वी एमआयडीसी पोलीस स्टेशनला दाखल झाला आहे. या प्रकरणात अद्याप एकाही आरोपीला अटक झालेली नाही. एकीकडे हातात पुरावे असल्यानेच गुन्हा दाखल केला असे पोलीस सांगत असताना दुसरीकडे न्यायालयानेही गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून चौघांचा अटकपूर्व फेटाळला. असे असतानाही यात अजून कोणालाच अटक केली नाही. एका संशयिताला पोलिसांनी आणलेही होते, मात्र पुढे काय झाले हे कळलेच नाही.अनधिकृत सुरु होते केंद्रसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्टÑ राज्य कौशल्य विकास सोसायटी अंतर्गत प्रमोद महाजन कौशल्य उद्योजकता विकास अभियानांतर्गत रायपुर येथे सुरु केलेले केंद्र भूषण बक्षे व शीतल पाटील यांनी पिंप्राळा येथे हलविल्याचे दाखविले, प्रत्यक्षात तेथे काहीच सुरु नाही. गणेश कॉलनी परिसरातील शिक्षणशास्त्र महाविद्यालयात हे केंद्र चालविले जात आहे.या प्रकरणाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाल्यानंतर या केंद्राला मान्यता देण्याचा प्रस्ताव जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राने मुंबई कार्यालयात पाठविला.त्याआधी ९ महिने हे केंद्र अनधिकृतच चालले. गुन्हा दाखल झाल्यानंतर नवीन पत्याला मंजुरी मिळाली आहे. दरम्यान, इतर सात केंद्रामध्ये हजेरीत बनवेगिरी आढळून आल्याने त्यांचा अनियमिततेचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे, त्याच प्रमाणे निमजाईच्या या केंद्रातील हजेरीही संशयास्पद आहे का? याची चौकशी होणे गरजेचे आहे. या प्रकरणात राजकीय दबाव येत असल्याचीही चर्चा आहे. पोलीस तपास सुरु आहे इतकेच सांगत असल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे.स्थानिक अधिकारीही संशयाच्या भोवऱ्यातकोणत्याही केंद्राचा पत्ता बदल करावयचा असेल तर जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचा तपासणी अहवाल शासनाकडे पाठवावा लागतो. या कार्यालयाने इतर सात केंद्राचा अनियमिततेचा प्रस्ताव मुंबई कार्यालयाकडे पाठविला, मग याच केंद्राचा का पाठविला नव्हता, असाही प्रश्न निर्माण होत आहे. तपासाधिकाऱ्यांनी मुंबई कार्यालयातून काही कागदपत्रे मिळविली असून स्थानिक अधिकारीही अडचणीत येण्याची शक्यता आहे.पोलीस म्हणतात, तपास सुरु आहेया प्रकरणात आरोपींना अटकेबाबत प्रभारी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे निरीक्षकरणजीत शिरसाठ यांना विचारला असता पुरावा असल्यानेच गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्याचा अजूनही तपास सुरु आहे. त्यासाठी तपासाधिकारी मुंबईलाही जावून आले. आरोपींच्या अटकेबाबत बोलण्यास मात्र त्यांनी टाळले. संदीप यांच्याशी संपर्क साधला असता ते औरंगाबाद येते खंडपीठात होते.यापूर्वीच फेटाळला यांचा अटकपूर्वनिमजाई फांऊडेशनचे भरत अरविंद भंगाळे (४०) मोहीनी भरत भंगाळे (३१) दोन्ही रा.भवानी पेठ, राजेश नरेंद्र नारखेडे (४९, रा.विनोबा नगर, जळगाव) व भगवान दगडू पाटील (४९, रा.वाल्मिक नगर, जळगाव) या चौघांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी