जळगाव शहरानजीक बसवर आदळताच कारने घेतला पेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 11:01 PM2018-02-18T23:01:26+5:302018-02-18T23:02:42+5:30

The car came to Jalgaon bus | जळगाव शहरानजीक बसवर आदळताच कारने घेतला पेट

जळगाव शहरानजीक बसवर आदळताच कारने घेतला पेट

Next
ठळक मुद्देमहामार्गावर ‘द बर्निंग कार’ चा थरार बस चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने झाला अपघात एअरबॅगमुळे वाचले प्राण


आॅनलाईन लोकमत
जळगाव, दि १८ : वळण घेत असताना बस चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने मागून आलेली कार बसवर आदळली व त्यात कारने लगेच पेट घेतला. दरम्यान, या अपघातात कारचची एअर बॅग उघडल्याने कारमधील प्रवाशांचा जीव वाचला. ही थरारक घटना शनिवारी रात्री १० वाजता बांभोरी येथे महामार्गावर घडली.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की,  गुजरात राज्यातील नवसारी येथील शांताराम मन्साराम पाटील हे रविवारी जळगाव शहरात नातेवाईकाकडे लग्न असल्यानेपत्नी व चालक संजय भिकाजी गाढे यांच्यासह कारने (क्र.जी.जे.२१.बी.सी.५०३२) शनिवारी दुपारी नवसारी येथून निघाले होते. रात्री त दहा वाजता उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडून जळगाव शहराकडे जात असताना कढोली रस्त्याकडून बांभोरी गावाकडे जैन कंपनीची बस (एम.एच.१९.वाय.१६४५) ही वळण घेत होती. बसवरील चालकाने अचानक ब्रेक दाबला, त्यामुळा बस जागेवरच थांबल्यामुळे विद्यापीठाकडून येत असलेली पाटील यांची कार बसवर धडकली.

अन् कारमधील लोकांनी काढला पळ
धडक ऐवढी जोरात होती की कार बसवर धडकताच कारमधील सेफ्टी ऐअर बॅग उघडल्या गेल्या. कारची काच फुटली. बॅग उघडल्या गेल्यामुळे कारमधील शांताराम पाटील, त्यांच्या पत्नी तसेच चालक संजय गाढे यांना कोणतीही दुखापत झाली नाही, परंतु या अपघातात कारला आग लागल्याने पाटील दाम्पत्याने स्वत:च्या बचावासाठी पळ काढला. नागरिकांनी धाव घेऊन आग विझविण्याचा प्रयत्न केला. जैन कंपनीचा अग्निशमन बंब पाचारण करण्यात आला होता.अपघात घडल्यानंतर बसचालक पसार झाल्याची माहिती मिळाली.

अपघाताची माहिती मिळताच पाळधी दूरक्षेत्राचे सहाय्यक फौजदार महारू गायकवाड, उमेश गायकवाड, चंद्रकांत पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. त्यानंतर शांताराम पाटील यांनी बसचालकाविरूध्द पोलिसात तक्रार दाखल केली आहे. या अपघातात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Web Title: The car came to Jalgaon bus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.