शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मोतीबिंदूमुक्त महाराष्ट्र मोहिमेचा शुभारंभ जळगावातून - डॉ. तात्याराव लहाने

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2017 21:41 IST

18 महिन्यात राज्यातील 17 लाख मोतीबिंदू असलेल्या रुग्णांवर शस्त्रक्रिया करुन मोतीबिंदूमुक्त महाराष्ट्र ही मोहिम पूर्ण करण्यात येणार आहे. या मोहिमेचा शुभारंभ 23 नोव्हेंबर 2017 रोजी जिल्हा सामान्य रुग्णालय, जळगाव येथून करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देमोतीबिंदूमुक्त महाराष्ट्र मोहिमेचा शुभारंभ जळगावातूनराज्यात मोतीबिंदूचे सुमारे 17 लाख रुग्णमोतीबिंदूमुक्त महाराष्ट्र करण्याचा संकल्प मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांचा

जळगाव : येत्या 18 महिन्यात (15 ऑगस्ट 2019 पर्यंत) मोतीबिंदूमुक्त महाराष्ट्र करण्याचा संकल्प मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी केला आहे. या संकल्प पूर्णत्वास जाण्यासाठी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांनी नियोजन केले असून पुढील 18 महिन्यात राज्यातील 17 लाख मोतीबिंदू असलेल्या रुग्णांवर शस्त्रक्रिया करुन मोतीबिंदूमुक्त महाराष्ट्र ही मोहिम पूर्ण करण्यात येणार आहे. या मोहिमेचा शुभारंभ 23 नोव्हेंबर 2017 रोजी जिल्हा सामान्य रुग्णालय, जळगाव येथून करण्यात येणार आहे. या अभियानाचा लाभ जिल्ह्यातील मोतीबिंदू असलेल्या रुग्णांनी घ्यावा, असे आवाहन पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी आज केले.या मोहिमेच्या शुभारंभनिमित्त करावयाच्या तयारीची आढावा बैठक डॉ. लहाने यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल मुंडके, रामेश्वर नाईक, पितांबर भावसार, अरविंद देशमुख यांचेसह जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना डॉ. लहाने म्हणाले की, राज्यात मोतीबिंदूचे सुमारे 17 लाख रुग्ण आहे. या रुग्णांना दृष्टि देण्यासाठी विशेष अभियान राबविण्याचा संकल्प मुख्यमंत्री महोदयांनी केला आहे. हे काम येत्या 18 महिन्यात पूर्ण करावयाचे असून यासाठी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांच्यावर नियोजनाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या मोहिमेचा भाग म्हणून येत्या 23 नोव्हेंबर रोजी जळगाव जिल्ह्यापासून शुभारंभ करण्यात येणार आहे. यासाठी 21 व 22 नोव्हेंबर रोजी चोपडा, यावल, रावेर, मुक्ताईनगर, बोदवड, भुसावळ, जामनेर या तालुक्यातील प्राथमिक व ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत रुग्णांची पूर्व तपासणी करण्यात येणार आहे. ज्या रुग्णांना मोतीबिंदू असेल त्यांना 23 तारखेला जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात येणार आहे. जिल्ह्यातील 2 हजार रुग्णांची तपासणी एकाच दिवशी करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा रुग्णालयातील 5 वॉर्डात तपासणी करण्यात येणार आहे. ही तपासणी डॉ. तात्याराव लहाने व डॉ. रागिणी पारेख स्वत: करणार आहे. ज्या रुग्णांच्या डोळयात मोतीबिंदू आढळेल त्यांचेवर 24 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर पर्यंत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. शस्त्रक्रिया करतांना दोन्ही डोळयांनी अंध, एका डोळयाने अंध व मोतीबिंदू फुटल्यामुळे काचबिंदू झालेल्या रुग्णांना प्राधान्य देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील 1200 रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याचे नियोजन आहे.या नियोजनानुसार जिल्हा सामान्य रुग्णालयातील तसेच ग्रामीण भागातील वैद्यकीय अधिकारी, नर्सींग स्टाप उपलब्ध करुन देण्यात येईल अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चव्हाण यांनी दिली. मोतीबिंदूमुक्त महाराष्ट्र या अभियानाचा शुभारंभ जळगाव जिल्हयातून होत आहे. ही जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे. हे अभियान यशसवीपणे पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून सर्वोतोपरी मदत करण्यात येईल असे आश्वासन निवासी उपजिल्हाधिकारी श्री. मुंडके यांनी या बैठकीत दिले. यावेळी रामेश्वर नाईक यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

• 15 ऑगस्ट 2019 पर्यंत मोतीबिंदूमुक्त महाराष्ट्र करण्याची मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांचा संकल्प• संकल्पाच्या पूर्ततेसाठी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांच्यावर नियोजनाची जबाबदारी• येत्या 18 महिन्यात राज्यातील 17 लाख रुग्णांवर करणार शस्त्रक्रिया• जिल्ह्यातील 1200 रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याचे नियोजन• डॉ. तात्याराव लहाने व डॉ. रागिणी पारेख 23 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर पर्यंत स्वत: करणार शस्त्रक्रिया• दोन्ही डोळयांनी अंध, एका डोळयाने अंध व मोतीबिंदू फुटल्यामुळे काचबिंदू झालेल्या रुग्णांवर प्राथम्याने होणार उपचार• *23 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील 2 हजार रुग्णांची तपासणी करण्याचे नियोजन यासाठी जिल्हा रुग्णालयातील 5 वॉर्डात होणार तपासणी

टॅग्स :Jalgaonजळगाव