आस्था सर्जरीतर्फे आज शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:00 IST2021-02-05T06:00:39+5:302021-02-05T06:00:39+5:30

शिक्षणशास्त्र महाविद्यालयात गांधी पुण्यतिथी जळगाव - केसीई सोसायटी संचालित शिक्षणशास्त्र आणि शारीरिकशास्त्र महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे महात्मा गांधी ...

Camp today by Astha Surgery | आस्था सर्जरीतर्फे आज शिबिर

आस्था सर्जरीतर्फे आज शिबिर

शिक्षणशास्त्र महाविद्यालयात गांधी पुण्यतिथी

जळगाव - केसीई सोसायटी संचालित शिक्षणशास्त्र आणि शारीरिकशास्त्र महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला प्राचार्य प्रा.अशोक राणे यांनी पुष्पहार अर्पण केले.उपप्राचार्य डॉ. केतन चौधरी , प्रा. शैलेजा भंगाळे, रासेयो प्रमुख प्रा. प्रवीण कोल्हे, जनसंपर्क अधिकारी प्रा. संदीप केदार, ज्ञानजगतचे समन्वयक उमेश दंडगव्हाळ, तांत्रिक समन्वयक तुषार भामरे, नीलेश नाईक, नीलेश जोशी, विजय चौधरी, केतन पाटील, विनोद पाटील, मेहमूद तडवी आदी उपस्थित होते.

देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा

जळगाव : विवेकानंद प्रतिष्ठान निवासी विभागात भारत मातेच्या प्रतिमेचे पुजन अध्यक्ष मधुसुदन जोशी व प्रमुख पाहुणे गोपाळ कुरकुरे यांच्या हस्ते झाले. सूत्रसंचालन रुपेश खैरनार, प्रणित वाघ यांनी केले. स्पर्धेत प्रथम नीलेश बारेला, द्वितीय आकाश पाटील, तृतीय अश्पाक तडवी तर अतुल बारेला याने उत्तेजनार्थ क्रमांक मिळविला. विजय पाटील यांनी गीत सादर केले. विनोद डी. पाटील, दुलारी प्रजापती यांनी केले. आभार प्रदर्शन दीपक पाटील यांनी केले.

Web Title: Camp today by Astha Surgery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.