शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
2
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
3
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
4
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
5
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
6
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
7
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
8
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
9
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
10
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
11
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
12
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
13
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
14
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
15
पार्थ अजित पवार जमीन प्रकरणात शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “समाजासमोर वास्तव...”
16
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...
17
उपाशी ठेवलं, बेदम मारलं... पोटच्या लेकाने, सुनेने जमिनीसाठी केले जन्मदात्या आईचे हालहाल
18
"वहिनी, तुमची जोडी जमत नाही, हे काका कोण?", रील्सचं वेड, सर्वस्व असलेल्या नवऱ्याच संपवलं
19
Viral Video: मिरची पूड घेऊन ज्वेलर्समध्ये शिरली, पण प्लॅन फसला! दुकानदारानं २० वेळा थोबाडलं
20
शेजाऱ्याशी लफडं, गुपित पतीला कळलं; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केली हत्या, मृतदेह नदीत फेकला

कवयित्री बहिणाबाई अध्ययन व संशोधन केंद्राला मंत्रीमंडळाची मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 12:32 IST

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात कवयित्री बहिणाबाई अध्ययन व संशोधन केंद्र सुरू करण्यास बुधवारी मंत्रीमंडळाच्या बैठकीत ...

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात कवयित्री बहिणाबाई अध्ययन व संशोधन केंद्र सुरू करण्यास बुधवारी मंत्रीमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली़ यामुळे विद्यापीठाशी निगडीत सर्व घटकांमध्ये तसेच खान्देशात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या केंद्रामुळे बहिणाबाईंच्या साहित्याचा सर्वांगाने अभ्यास होणार आहे.गतवर्षी ११ आॅगस्टला विद्यापीठाच्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ असा नामविस्तार झाला. त्यानंतर ८ आॅक्टोबर, २०१८ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व इतर मान्यवर मंत्र्यांच्या उपस्थितीत नामविस्तार सोहळा विद्यापीठात साजरा झाला. या सोहळ्यास मुख्यमंत्र्यांनी विद्यापीठाच्या मागण्यांचे प्रस्ताव राज्यसरकारकडे पाठवावेत. विद्यापीठाच्या पाठीशी सरकार उभे राहिल अशी ग्वाही दिली होती. त्यानंतर विद्यापीठाने विकासाचे काही प्रस्ताव शासनाकडे सादर केले. डिसेंबर महिन्यात कुलगुरू प्रा. पी.पी. पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची प्रत्यक्ष भेट घेवून चर्चा केली होती.काय असणार केंद्रामध्ये़़़बहिणाबाईंच्या जीवनाविषयी व त्यांच्या कवितांविषयी माहिती देणारे केंद्र म्हणून कार्य करणे, बहिणाबाईंची माहिती देणारे दृकश्राव्य दालन उभारणे, कवितांवरील लेखांचे संकलन करणे, लेवाबोली- समाज संस्कृती यांच्या अभ्यासास प्रोत्साहन देणे, संबंधित विषयांचे प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरु करणे, महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने आवश्यक उपक्रम आयोजित करणे अशी काही उद्दीष्टे हे केंद्र सुरू करण्यासाठी विद्यापीठाने निर्धारित केली आहेत.विद्यापीठाने या केंद्रासाठी नवीन पदनिर्मिती व त्यासाठी वित्तीय तरतूद मिळण्याची विनंती प्रस्तावात केली आहे.अन् केंद्र स्थापन करण्यास मिळाली मंजुरी८ मार्च, २०१९ ला कवयित्री बहिणाबाई चौधरी अध्ययन व संशोधन केंद्र स्थापन करण्यास उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून तत्वत: मंजुरी दिली होती. त्यानुसार बुधवारी मुंबईत झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत हे केंद्र स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आली. या मंजुरीबद्दल कुलगुरू प्रा. पी.पी. पाटील, प्र-कुलगुरू प्रा. पी.पी. माहूलीकर यांनी राज्य शासनाचे अभिनंदन केले आहे़

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव