जळगाव : दुकानांचा लिलाव होतो की जप्ती या चिंतेतच मुकेश घनश्यामदास जाधवाणी (42, सिंधी कॉलनी) या व्यापा:याने आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, याच कारणामुळे फुले व सेंट्रल फुले मार्केटमधील तब्बल सहाशे व्यापारी अजूनही तणावातच आहेत. मनपाने चर्चा करून मार्ग काढावा अशी अपेक्षा व्यापा:यांनी व्यक्त केली आहे. फुले व सेंट्रल फुले मार्केटमध्ये गेल्या अनेक वर्षापासून व्यापारी आपला व्यवसाय करताहेत. जागतिक मंदी व त्यातच व्यवसायातील स्पर्धा यामुळे व्यापार टिकविण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असताना मनपाकडून लिलाव व जप्तीची भीती दाखविली जात आहे. तत्कालीन नगरपालिकेने घेतलेल्या कर्जाशी व्यापा:यांचा संबंध नसताना व्यापारी टार्गेट करून कर्जफेडीसाठी त्यांच्याकडून ही रक्कम वसूल करण्याचा घाट प्रशासनाने घातला आहे. दुकानाचा लिलाव झाला तर तितकी रक्कम भरू शकू का? वर्षानुवर्षापासून आपल्या ताब्यात असलेले दुकान पुन्हा आपल्याच ताब्यात राहिल का? या चिंतेने व्यापा:यांना ग्रासले असल्याचे अशोक मंधान यांनी ‘लोकमत’ ला सांगितले. मनपाच्या मालकीच्या कोटय़वधीच्या मालमत्ता आहेत, त्याची विक्री केली तरी कर्जातून मुक्ती मिळू शकते. मनपाने काही दिवसापूर्वी 9 गाळे जप्त केले होते. राज्य शासनाने हस्तक्षेप केल्याने ते परत मिळाले. अन्यथा त्यांच्याजवळ आत्महत्येशिवाय कोणताच पर्याय उरला नव्हता.
चिंतेतूनच व्यापा:याची आत्महत्या
By admin | Updated: October 16, 2015 00:52 IST