शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
4
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
5
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
6
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
7
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
8
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
9
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
10
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
11
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
12
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
13
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
14
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
15
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
16
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
17
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
18
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
19
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
20
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

सावखेडा खुर्द गावी आगीत ४० क्विंटल कापूस जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 16:36 IST

पाचाेरा तालुक्यातील सावखेडा खुर्द गावी शनिवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास रमेश गुलाब परदेशी यांच्या घराला लागलेल्या आगीत ९० क्विंटल कापूस जळून खाक झाला. तसेच संसारोपयोगी साहित्यही जळून खाक झाले.

ठळक मुद्दे२५ हजार रोकडसह घरातील संसारोपयोगी वस्तूंचा कोळसा संसाराची झाली राखरांगोळी

लोकमत न्यूज नेटवर्क

वरखेडी, ता. पाचोरा : येथून जवळच असलेल्या सावखेडा खुर्द गावी शनिवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास रमेश गुलाब परदेशी यांनी आपल्या १० एकर शेतात पिकविलेला कापूस आपल्या डांभूर्णी रोडला लागून सिमेंट वीट व पत्र्याचे असलेल्या राहत्या घरात ९० क्विंटल कापूस भरून ठेवलेला होता. ते आपल्या घरात असलेल्या कापसाला योग्य भाव मिळण्याच्या प्रतीक्षेत असताना अकस्मात कापसाला आग लागून मोठे नुकसान झाले.

या आगीत ४० क्विंटल कापूस जळून खाक झाला. तसेच घरातील रोख रक्कम २५ हजार रुपये व संसारोपयोगी सर्व वस्तू जळून खाक झाल्या. यात पावणेसहा लाखाचे नुकसान झाले. घरात असलेल्या रॅकवरील व पदीवर ठेवलेले भांडे अक्षरश: वितळून पाणी झाले. तसेच घरातील सर्व अन्नधान्यदेखील या आगीत जळून खाक झाले. त्यामुळे रमेश गुलाब परदेशी यांचा परिवार उघड्यावर आला.

आगीची वार्ता कळताच गावातील ग्रामस्थ या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पाण्याचा मारा करू लागले. परंतु आगीने रौद्र रूप धारण केले असल्याने आग विझविण्यात बाधा येत होती. सुमारे तासभर अग्नितांडव सुरू असताना सायंकाळी पाचोरा येथील अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाल्यानंतर ही आग आटोक्यात आली. परंतु तोवर होत्याचे नव्हते झाले होते.

या शेतकऱ्याच्या संसाराची पूर्णतः राखरांगोळी झाली होती. शेतकरी व त्याचा परिवार धायमोकलून रडत होते. तलाठी किरण मेदान यांनी रविवारी सकाळी ९:३० वाजता घटनास्थळी जावून पंचनामा केला.

टॅग्स :JalgaonजळगावHomeघरfireआग