शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस कर्मचाऱ्याकडेच घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2020 22:42 IST

रायसोनी नगरातील घटना : ७० हजाराचा ऐवज लांबविला

जळगाव : महामार्ग सुरक्षा पथकात चाळीसगाव येथे कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी नरेश भिका सोनवणे (३५) यांच्या रायसोनी नगरातील बंद घराचे कुलुप तोडून चोरट्यांनी ४२ हजार रुपये रोख व सोन्याचे दागिने असा एकूण ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल लांबविल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नरेश सोनवणे महामार्ग सुरक्षा पथकात कार्यरत आहेत. रायसोनी नगरातील साई विहीरनजीक प्लॉट क्र.४६४ मध्ये पत्नी अश्विनी, मुलगी पूर्वा व मुलगा देवांशु अशांसह वास्तव्याला आहेत. २६ जानेवारी रोजी रात्री १० वाजता ते घराला कुलुप लावून परिवारावस मोहाडी, ता.जळगाव या मुळ गावी गेले होते. सोमवारी सकाळी घरी परतले असता दरवाजाला लावलेले कुलुप तोडलेले होते व कडी कोयंडा तुटलेला होता. टॅमीच्या सहाय्याने कुलुप व कडी तोडलेली होती. फ्रिजवर ठेवलेली पर्स व बेडरुममधील कपाट तुटलेले होते. कपाटातील ४२ हजार रुपये रोख १० हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी, १६ हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी असा ६८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल गायब झालेला होता. चोरीचा प्रकार लक्षात आल्यानंतर सोनवणे यांनी रामानंद नगर पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करुन परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव