शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

पोलिसांच्या नाकावर टिच्चून घरफोड्या, चोरट्यांची हॅट्रीक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 12:52 IST

इंद्रप्रस्थ, राधाकृष्ण व प्रजापत नगरातील घटना; नागरिकांमध्ये भीती

जळगाव : शहरात गेल्या तीन दिवसापासून चोरी व घरफोडीच्या घटना घडत असून सोमवारीही दोन ठिकाणी घरफोडी तर एका ठिकाणी घरफोडीचा प्रयत्न झाला. शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील इंद्रप्रस्थ नगरातील मनोज पुंडलिक तिळवणे यांच्याकडे एक लाखाचा ऐवज लांबविण्यात आला. प्रजापत नगरात धर्मेश भोजराज पांडव यांच्याकडे एक हजार रुपये रोख तर राधाकृष्ण नगरात चोरीचा प्रयत्न झाला.सलगच्या चोऱ्या व घरफोड्यांनी रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. पोलिसांच्या नाकावर टिच्चून सातत्याने घरफोडीच्या घटना घडत आहेत. घटना रोखण्यासाठी वरिष्ठांकडूनही कोणत्याही उपाययोजना किंवा गस्तीचा आढावा घेतला जात नाही. दरम्यान, पोलिसांसाठी या घटना आव्हान ठरल्या आहेत.रक्षाबंधनाला गेले अन् लाखो रुपये लांबविलेमनोज पुंडलिक तिळवणे हे आई सिंधुबाई पत्नी मंगला, मुले सुशांत व पियुष यांच्यासह इंद्रप्रस्थ नगरात वास्तव्यास आहेत. ते बांभोरी येथील जैन इरिगेशन या कंपनीत आॅपरेटर म्हणून नोकरीला आहे. १७ रोजी कुटुंबिय रक्षाबंधननिमित्ताने बºहाणपूर येथे गेले. सोमवारी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास गावाहून परतले. मुख्य लोखंडी गेटचे कुलुप उघडल्यावर आतील दरवाजाचा कोयंडा कापलेला दिसला. घरात पाहणी केली असता कपाटातील तसेच पलंगातील साहित्य अस्ताव्यस्त फेकलेला होते. चोरट्यांनी घरातून दोन तोळ्याची सोन्याची पोत, पाच ग्रॅमची सोन्याची अंगठी असे अडीच तोळे सोने व ४० हजार रुपये रोख असा ऐवज लांबविला.अंगणात चोरट्यांनी केली शौचतिळवणे यांच्या घरी चोरी केल्यानंतर चोरट्यांनी अंगणात शौच केली. यानतर पोबारा केला. दरम्यान कुंपनात एक प्लॅस्टिकची बॅटरी सापडली असून ती चोरट्यांची असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. या परिसरात महापालिकेचे पथदिवे बंद असल्याने चोरट्यांना चांगलेच फावत असून पथदिवे सुरु करावेत अशी मागणी नागरिकांनी केली. दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर शहर पोलिसांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. सायंकाळी एका घटनेची पोलिसात नोंद झाली.राधाकृष्ण नगरात प्रयत्न फसलाराधाकृष्ण नगरात वैद्यकिय औषधीचे डीस्ट्रीब्युटर्स असलेल्या रघुनाथ आनंदा तेली यांच्याकडेही घरफोडीचा प्रयत्न झाला. चोरट्यांचा येथे प्रयत्न फसला आहे. तेली यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली, मात्र फिर्याद देण्यास त्यांनी नकार दिल्याची माहिती शहर पोलिसांनी दिली. दरम्यान, तेली यांच्याकडील काही सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळालेले आहेत, त्यामुळे चोरटे निष्पन्न होवू शकतात, असे सांगण्यात आले.श्वान पथक, फिंगर प्रिंट कुचकामीगेल्या काही वर्षापासूनच्या चोरी, घरफोडी व अन्य घटनांमध्ये श्वान पथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण केले जाते. मात्र आतापर्यंतच्या घटना पाहता श्वान पथक व ठसे निव्वळ फार्स ठरल्या आहेत. त्यांच्यापासून ना पोलिसांना पुरावा मिळाला ना गुन्हा उघडकीस आला. या यंत्रणांवर वर्षाला लाखो रुपये खर्च होतात. स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नियुक्ती असतानाही या यंत्रणा कुचकामी ठरत असल्याचे सिध्द होत आहे.दुष्काळात तेरावा महिनातिळवणे यांच्यासाठी ही घटना म्हणजे दुष्काळात तेरावा महिना आहे. तिळवणे यांनी नवीन घर घेण्यासाठी पैसे जमविले होते, तसेच कंपनीत चार महिन्यापासून पगार नाही, त्यातच ही घटना घडली. या घटनेमुळे आर्थिक संकट ओढवले असल्याचे मनोज तिळवणे यांनी सांगितले.नागरिकही टाळताहेत जबाबदारीशहरात सातत्याने चोºया व घरफोड्या होत असल्याचे वारंवार वर्तमानपत्रातून दिसत असतानाही बाहेरगावी जाताना रोख रक्कम व दागिने घरात ठेवून जात असल्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे नागरिकही काहीअंशी जबाबदार असल्याचे दिसून येत आहे.गावात आईचे निधन; दुसरीकडे घरफोडीधर्मेश भोजराज पांडव हे खासगी आस्थापनात व्यवस्थापक असून पत्नी कोमल, मुलगा हर्षल व मुलगी हेमा यांच्यासह ममुराबाद रस्त्यावर असलेल्या प्रजापतनगरातील सुनंदिनी पार्कमध्ये राहतात. पांडव यांची आई प्रभावती यांचे १७ रोजी यावल तालुक्यातील म्हैसवाडी या मुळ गावी निधन झाल्याने ते कुटुंबासह गावाला गेले असताना त्यांच्याकडे चोरट्यांनी घरफोडी करुन एक हजार रुपये रोख लांबविले. गॅस सिलिंडरसाठी ठेवलेले पुस्तकातील पाचशे रुपये सुरक्षित राहिले. चोरट्यांनी खिडकीवर चढून बाहेरील लाईट फोडले आहेत. सोमवारी सकाळी १० वाजता पांडव यांच्याकडे गॅस सिलिंडर पोहचविण्यासाठी एजन्सीचा कर्मचारी आला असता हा प्रकार त्याच्या लक्षात आला. समोर राहणाºया एका महिलेने पांडव गावी गेले असल्याचे या कर्मचाºयाला सांगितले. परंतु घराचा दरवाजा उघडा असल्याचे या कर्मचाºयाने निदर्शनास आणून दिले. ही घटना तालुका पोलिसांच्या हद्दीत घडली आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव