शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

जळगावातील मकरंद कॉलनीत घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 12:43 IST

मकरंद कॉलनीतील राजू अशोक गुरव यांच्या बंद घराचे कुलुप तोडून चोरट्यांनी  एक लाख रुपये रोख, ६० हजाराचे सोन्याचे दागिने तर ४० हजाराचे चांदीचे दागिने लांबविल्याचा प्रकार रविवारी उघडकीस आला. शनिवारी मध्यरात्री चोरट्यांनी लोखंडी व लाकडी दरवाजाचे कुलुप व कडीकोयंडा तोडून धुडगूस घातला आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोख रक्कम ही राजू यांचे मावस भाऊ प्रतिक याच्या लग्नाची होती.

ठळक मुद्दे दीड लाखाचा ऐवज लांबविला रोकड नवरदेवाची होती

जळगाव : मकरंद कॉलनीतील राजू अशोक गुरव यांच्या बंद घराचे कुलुप तोडून चोरट्यांनी  एक लाख रुपये रोख, ६० हजाराचे सोन्याचे दागिने तर ४० हजाराचे चांदीचे दागिने लांबविल्याचा प्रकार रविवारी उघडकीस आला. शनिवारी मध्यरात्री चोरट्यांनी लोखंडी व लाकडी दरवाजाचे कुलुप व कडीकोयंडा तोडून धुडगूस घातला आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोख रक्कम ही राजू यांचे मावस भाऊ प्रतिक याच्या लग्नाची होती.याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, मकरंद कॉलनीतराजू अशोक गुरव हे आई नलिनी, पत्नी वैशाली व आजी कोकीळाबाई प्रल्हाद गुरव यांच्यासह वास्तव्याला आहेत. राजू यांचा मावसभाऊ प्रतिक देवरे याचे मागील आठवड्यात जळगावात लग्न झाले. या लग्नाची जबाबदारी राजू यांच्यावरच होती. २० फेब्रुवारी रोजी मुंबईत लग्नाचे रिसेप्शन होते. त्यामुळे गुरव परिवार १९ रोजी रात्रीच मुबंईला गेले होते. तेथून शनिवारी रात्री संपूर्ण परिवार जळगावकडे रवाना झाला. रविवारी सकाळी सात वाजताच ते घरी आले असता वॉलकंपाऊडचे लोखंडी गेट व आतमधील लाकडी दरवाजा या दोघांचे कुलूप तुटलेले होते तर घरात साहित्याची नासधूस केलेली होती. 

दोन कपाटाचे कुलुप तोडलेघरात पाहणी केली असता दोन्ही बेडरुममधील कपाटाचे कुलुप चोरट्यांनी तोडले आहेत. त्यातील एक लाख रुपये रोख, २० ग्रॅम सोन्याचे दागिने (अंगठी व कानातील टॉप्स), १५ भार चांदी व इतर असा ऐवज गायब झालेला होता.घटनेची माहिती मिळाल्यानंतर रामानंद नगर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. श्वान पथकाला कुलुप सुंगवले असता त्याने महाबळ कॉलनीच्या दिशेने दोनशे मीटरपर्यंत माग दाखविला. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव