शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

मौजमस्तीसाठी ‘बंटी-बबली’ने चोरल्या तब्बल २५ दुचाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 10:42 IST

एलसीबीकडून पर्दाफाश : शंभर रुपयांच्या स्टॅम्पवर दुचाकींची विक्री, वेगवेगळ््या ठिकाणाहून घेतले ताब्यात

जळगाव : कमी श्रमात अधिक पैसा मिळवायचा व त्यात मौजमस्ती करायची यासाठी निवृत्ती उर्फ छोटू सुकलाल माळी (४८,धरणगाव) व हेमलता देविदास पाटील (३४, रा.अमळनेर) या ‘बंटी-बबली’च्या जोडीने जिल्ह्यात तब्बल २५ दुचाकी चोरी केल्या असून त्याची विक्री शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर अगदी कमी भावात केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या बंटी-बबलीचा मंंगळवारी भांडाफोड केला आहे.धरणगाव येथील एक पुरुष व अमळनेर येथील महिला धरणगावात स्टॅम्प पेपर तयार करुन चोरीच्या दुचाकी कमी किमतीत विक्री करीत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे हवालदार संजय सपकाळे, सुधाकर अंभोरे व अशरफ शेख यांना मिळाली होती. या पथकाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापू रोहोम यांना गुन्ह्याची पध्दत, आरोपीचा इतिहास व दुचाकी कुठे कुठे विक्री झाल्या आहेत, त्याची सविस्तर माहिती दिली. त्यानुसार रोहोम यांनी सहायक फौजदार अशोक महाजन, हवालदार संजय सपकाळे, सुधाकर अंभोरे ,अशरफ शेख, दत्तात्रय बडगुजर, विनायक पाटील, किरण चौधरी, महेश महाजन, पल्लवी मोरे, वैशाली पाटील, राजु पवार, इद्रीस पठाण तसेच सहायक फौजदार विजय पाटील,श्रीकृष्ण पटवर्धन व नरेंद्र वारुळे यांच्या पथकाला ही जबाबदारी सोपविली. या पथकाने सर्वात आधी छोटू याला पलायन करण्यापूर्वीच धरणगाव-अमळनेर रस्त्यावरुन ताब्यात घेतले तर हेमलता हिला अमळनेरातून ताब्यात घेतले.हेमलताचा वेश पुरुषासारखा... हेमलता हीच वेश हा पुरुषासारखाच आहे. पुरुषाचेच कपडेही परिधान करते, त्यामुळे ती महिला आहे हे लवकर कळत नाही. बनावट चावीने दुचाकी चोरली की काही अंतरावर थांबलेल्या छोटूला घेऊन स्वत: दुचाकी चालवून रफूचक्कर व्हायचे. हेमलता हिच्याविरुध्द याआधी रामानंद नगर पोलीस ठाण्यात देखील दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल आहे. दरम्यान, दोघांना एरंडोलच्या गुन्ह्यात ताब्यात देण्यात आले असून मंगळवारी एरंडोल न्यायालयाने २३ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.समलिंगी प्रकरणात झाली ओळखकाही वर्षापूर्वी समलिंगी तरुणींच्या प्रेमप्रकरणाचे प्रकरण धरणगावात घडले होते. या प्रकरणात छोटू याने हेमलता हिला मदत केली होती. तेव्हापासून दोघांमध्ये ओळख व मैत्रीचे संबंध निर्माण झाले. हेमलता हिने १० वर्षापूर्वी पतीपासून घटस्फोट घेतला आहे. १५ वर्षाच्या मुलासोबत ती अमळनेरात वास्तव्य करते तर छोटू हा विवाहित असून त्याला दोन मुले व एक मुलगी आहे. हेमलता अमळनेर येथून धरणगावात यायची व तेथून छोटूला सोबत घेऊन दोघंही जळगाव, एरंडोल, चाळीसगाव या भागात दुचाकी चोरी करायला जायचे. विक्रीच्या पैशातून मौजमस्ती करायचे.चोरीची वस्तू आहे हे माहिती असूनही ती विकत घेणे गुन्हा आहे. त्यामुळे या २५ दुचाकी विकत घेणाऱ्या सर्वच लोकांना या गुन्ह्यात आरोपी केले जाणार आहे. यापुढे देखील गुन्ह्यात मदत करणाऱ्यांना आरोपी केले जाणार आहे. जनतेने देखील लोभामुळे कमी किमतीत व स्वस्त मिळते म्हणून वस्तू घेवू नये.-डॉ.पंजाबराव उगले, पोलीस अधीक्षक

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव