शहरं
Join us  
Trending Stories
1
जून ते सप्टेंबर ९९टक्के पाऊस; कोकण, नाशिक, पूर्व विदर्भात उत्तम पाऊस होण्याचा अंदाज
2
'या' चार राज्यांमध्ये मोठा उलटफेर होणार; भाजप जोरदार मुसंडी मारण्याची शक्यता
3
"मला T20 World Cup बघायचाही नाही, जेव्हा मी...", रियान परागचं अनोखं विधान
4
मे महिन्यात देशभरात उष्माघाताचे ४६ बळी; तीन महिन्यांत ५६ मृत्यू, महाराष्ट्रात ११ जण मृत्युमुखी
5
आजचे राशीभविष्य: सरकारी लाभ, यश-कीर्ती वृद्धी; पद-प्रतिष्ठा वाढ, सुखकारक दिवस
6
अरुणाचलमध्ये भाजपच; सिक्कीम ‘एसकेएम’चेच; दोन राज्यांमधील विधानसभा निवडणूक
7
शिक्षक मतदारसंघासाठी भाजपची उमेदवारी नक्की कोणाला?
8
प्रदोष शिवरात्रीचा शुभ संयोग: ‘असे’ करा व्रताचरण; पाहा, शुभ मुहूर्त, महत्त्व अन् मान्यता
9
पंचग्रही अद्भूत शुभ योग: ७ राशींना लाभ, लॉटरीची संधी; राजकारण्यांना यश, इच्छापूर्तीचा काळ!
10
WI vs PNG : हलक्यात घेऊन चालणार नाही! नवख्या संघानं वेस्ट इंडिजला घाम फोडला, कसाबसा सामना जिंकला
11
पंचग्रही योग: ‘या’ ५ मूलांकांना सुख-समृद्धी काळ, धनलाभाची संधी; पद-पैसा वृद्धी, शुभ होईल!
12
बॉम्बच्या धमकीमुळे विमानाचे इमर्जन्सी लँडिंग, पॅरिसहून येणाऱ्या विमानात मिळाली चिठ्ठी
13
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे तिहार तुरुंगात आत्मसमर्पण
14
जोकोविचला पाच सेटपर्यंत करावा लागला संघर्ष, रॉजर फेडररच्या विक्रमाशी केली बरोबरी
15
अभिनेत्री रवीना टंडनसह ड्रायव्हरला संतप्त जमावाची मारहाण
16
उद्योगपती गौतम अदानी भारतात सर्वात श्रीमंत, जगात सर्वाधिक श्रीमंतांकडे किती संपत्ती? 
17
नव्या उच्चांकासाठी बाजार सज्ज, एक्झिट पोलमधून देशात स्थिर सरकारचे येण्याचे संकेत
18
अनिल परब आज उमेदवारी अर्ज दाखल करणार
19
प्रवासकोंडीचे ग्रहण सुटले, मध्य रेल्वेवर जम्बो ब्लॉकला पूर्णविराम
20
एआय एक्झिट पोलमध्येही 'कमळ'; पण इंडियाच्याही जागा वाढणार

चहार्डी येथील ९० लाख रुपये खर्चून उभारलेला बंधारा दूर्लक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 7:20 PM

चोपडा तालुक्यातील चहार्डी येथील कोल्हापूर पद्धतीचा गेल्या पंधरा वर्षांपासून ९० लाख रुपये खर्चून उभारलेला बंधारा लघुसिंचन विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे दुर्लक्षित झाला असून शासनाच्या पैशांचा चुराडा झाला आहे. विशेष म्हणजे स्थानिक लोकप्रतिनिधी, ग्रामस्थांचीही बंधाऱ्याविषयी अनास्था असल्याने संताप व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देपंधरा वर्षात केवळ एकदाच झाला बंधाºयात पाणी साठाबंधाºयाच्या फळ्या चोरीस, तर काही सडून गेल्याग्रामपंचायतीकडे हस्तांतरणदेखील नाही

लोकमत आॅनलाईनसंजय सोनवणेचोपडा, दि.१९ : एकीकडे आपल्या भागातील नदीवर बंधारे उभारावेत यासाठी काही गावातील ग्रामस्थ वारंवार उपोषण करीत असतांना मात्र चहार्डी येथे लाखो रुपये खर्च करून उभारलेल्या बंधाºयाकडे तब्बल पंधरा वर्षांपासून दूर्लक्ष झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. केवळ एकदाच पाणी साठवण झालेला हा बंधारा किरकोळ दुरूस्तीच्या उपेक्षेमुळे आज मरणप्राय अवस्थेत उभा असून लोकप्रतिनिधींसह गावकºयांच्याही अनास्थेचा तो बळी ठरला आहे. यामुळे सुज्ञ नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.सद्याच्या पाणी टंचाईच्या काळात थेंब थेंब पाण्याला महत्व आले आहे. मात्र पंचायत समितीच्या लघुसिंचन विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे चहार्डी. ता चोपडा येथील चंपावती व रत्नावती नद्यांच्या संगमापासून अर्ध्या किलोमीटर अंतरावर गेल्या पंधरा वर्षांपासून ९० लाख रुपये खर्च करून बांधण्यात आलेला कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा दुर्लक्षित झाला आहे.हस्तांतरणदेखील नाहीविशेष म्हणजे पंधरा वर्षांपूर्वी काम पूर्ण झालेला हा बंधारा बांधून लघु सिंचन विभागाकडून ग्रामपंचायतीकडे हस्तांतरणाची औपचारिकताही पूर्ण करण्यात आलेली नाही. यात शासनाचा ९० लाख रुपयांचा चुराडा झाला आहे. या बंधाºयात पाणी अडविण्यासाठी पंधरा वर्षांपूर्वी आणण्यात आलेल्या लोखंडी फळ्या वापर न झाल्याने जागेवरच पडून पडून अखेर सडून गेल्यात. काही फळ्या ग्रामस्थांनी बसण्यासाठी बाकडा करण्यासाठी पळवून नेल्या आहेत तर काही फळ्या भंगार चोरांनी चोरून नेल्या आहेत. मात्र याबाबत स्थानिक आजी माजी पदाधिकाºयांना, सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांना काहीच सोयरं सुतक नसल्याचे चित्र सध्यातरी समोर आले आहे. शासनाने एवढा मोठा निधी खर्च करून बंधारा बांधला खरा, परंतु त्याची देखभालीची जबाबदारी घ्यायला कोणीही पुढे सरसावत नसल्याने पाणी अडविण्याबाबत उदासिनता दिसून येत आहे. सध्या चहार्डी गावातच पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई असताना या बंधाºयात पाणी अडविण्यासाठी काहीच हालचाल होत नसेल तर ते येथील ग्रामस्थांचे दुर्भाग्य समजावे लागेल.खासदारांनाही पडला विसरदरम्यान, गेल्या वर्षी २९ जून रोजी येथील दोन्ही नद्यांना महापूर आल्याने व बंधाºयात कचरा अडकून चहार्डी गावात पाणी घुसून हानी झाली होती. त्यावेळी खासदार रक्षा खडसे पाहणीसाठी आल्या असता त्यांनी कोल्हापुरी बंधाºयाची उंची कमी करण्याचे आश्वासन बाधित ग्रामस्थांना दिले होते. मात्र खडसे यांना याचा विसर पडल्याने या बंधाºयाची ना उंची कमी करण्यात आली, ना हा बंधारा अधिकाºयांच्या सांगण्यानुसार दुरुस्त करण्यात आला. जे येतात ते केवळ भेट देऊन जातात व वेळ मारून नेतात. आता पावसाळा सुरू होण्याची वेळ येऊन ठेपली तरी कोणताच निर्णय झाला नसल्याने पुन्हा नद्यांचे पाणी गावात घुसेल आणि तोच कित्ता गिरवला जाईल, असे बोलले जात आहे. मात्र या विषयावर गावातील जाणकार नागरिक एकत्र येऊन आवाज उठविण्यासाठी तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्याच्या पवित्र्यात असल्याचे समजले आहे. या प्रश्नाकडे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनीदेखील लक्ष घालणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे. 

टॅग्स :Chopdaचोपडा