शहरं
Join us  
Trending Stories
1
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
3
तमाशातील नर्तकीवर प्रेम, पण ती टाळायला लागल्याने माजी उपसरपंच झाला वेडापिसा, त्यानंतर तिच्या घरासमोरच उचललं टोकाचं पाऊल
4
वर्क फ्रॉम होम कल्चर संपतंय का? 'या' दिग्गज टेक कंपनीनंही आपल्या कर्मचाऱ्यांना ऑफिसला बोलावलं
5
रशिया-युक्रेन युद्धात 'या' देशानं मारली उडी; रशियन ड्रोन्स पाडले, F 16 लढाऊ विमाने हवेत झेपावली
6
धनत्रयोदशी-दिवाळीपर्यंत कुठवर पोहोचणार सोन्याचा दर? आता आहे ₹१.१२ लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहाच
7
'ही' छोटी कार आता ३ लाख रुपयांपर्यंत स्वस्त; जीएसटी कपातीमुळे नवीन किंमती जाहीर
8
नेपाळमध्ये लष्कराने सूत्रं हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोची विमान उड्डाणे रद्द
9
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
10
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
11
महाराष्ट्रात ७०० आरटीओ अधिकाऱ्यांची कमतरता, प्रशासनावर ताण
12
"त्याला उचकी आली आणि...", 'अशी ही बनवा बनवी'मधील शंतनूचं असं झालं निधन, पत्नीचा खुलासा
13
वाद-प्रतिवाद सुरू असलेल्या भारताला आज स्वीकारमंत्र अंगीकारण्याची गरज -मोरारीबापू
14
Prithvi Shaw: सपना गिल विनयभंग प्रकरणात न्यायालयाने पृथ्वी शॉला ठोठावला १०० रुपयांचा दंड!
15
Stock Markets Today: शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २५,००० च्या पार; IT-रियल्टी शेअर्समध्ये जोरदार तेजी
16
सी. पी. राधाकृष्णन : संघस्वयंसेवक ते उपराष्ट्रपतिपदापर्यंतचा चढता आलेख
17
जे कोणालाच जमलं नाही ते आर्यन खानने केलं, 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून दिलं मोठं सरप्राईज
18
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
19
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
20
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल

देशातील तीन विद्यापीठातील देशद्रोही व विघटनवादी शक्तींविरुद्ध जळगावात ‘बुक्का मोर्चा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 11:57 IST

राष्टÑीय सुरक्षा मंच, श्री स्वामी विवेकानंद बहुउद्देशिय मंडळ व देशप्रेमींतर्फे मोर्चा

ठळक मुद्देदेशद्रोही व विघटनादी शक्तींना ‘दे बुक्का’दिव्यांग बांधवांचाही सहभाग

जळगाव : देशातील तीन विद्यापीठातील देशद्रोही व विघटनवादी शक्तींविरुद्ध कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी राष्टÑीय सुरक्षा मंच, श्री स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय मंडळ तसेच देशप्रेमी नागरिकांतर्फे गुरुवारी बळीरामपेठेतून जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘बुक्का मोर्चा’ काढण्यात आला. शहरातील प्रमुख मार्गावरून देशद्रोही शक्तींविरोधात घोषणा देत हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. त्यामुळे संपूर्ण शहर या घोषणांनी दणाणले.अलिगढ मुस्लीम युनिव्हर्सिटी, जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी तसेच हैद्राबाद येथील सेंट्रल युनिव्हर्सिटीमधील देशद्रोही व विघटनवादी शक्तींविरुद्ध कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी श्री स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय मंडळाचे अध्यक्ष व माजी नगरसेवक कैलास सोनवणे, राष्टÑीय सुरक्षा मंचचे अध्यक्ष अनिल सोनवणे यांच्या नेतृत्वात या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ११.१५ वाजता बळीरामपेठेतून या मोर्चाला प्रारंभ झाला.दिव्यांग बांधवांचाही सहभागमोर्चात काही दिव्यांग बांधव त्यांच्या तीन चाकी वाहनावर तर काही व्हील चेअरवर सहभागी होत देशद्रोह्यांवर कारवाईच्या घोषणाही देत होते.या होत्या घोषणामोर्चात सहभागी विद्यार्थी, नागरिकांनी हातात घोषणांचे फलक घेतले होते. त्यावर देशद्रोही मुर्दाबाद, आतंकवाद मुर्दाबाद, नक्षलवाद मुर्दाबाद, भारत माता की जय, वंदे मातरम, ‘सर्जिकल स्ट्राईक तो झाँकी है, पुरा आक्रमण अभी बाकी है’, विघटनवादी शक्तींचा निषेध आदी घोषणा असलेले फलक लावलेले होते. तसेच ‘विघटनवादी शक्तींना दे बुक्का, दे बुक्का’ ‘वंदे मातरम’, ‘भारत माता की जय’ अशा जोरदार घोषणा दिल्या जात होत्या. त्यामुळे परिसर दणाणला.मोर्चेकऱ्यांना केले मार्गदर्शनकिशोर शितोळे तसेच कैलास सोनवणे यांनी मोर्चेकºयांना यावेळी मार्गदशर््ान केले. विद्यापीठांमध्ये शिक्षण घेण्याऐवजी देशविघातक कार्यामध्ये सहभागी होत असलेल्यांवर कारवाई करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी यावेळी मांडले. देशाच्या एकता व अखंडतेला आव्हान देणाºयांचा बिमोड करण्यासाठी सगळ्यांनी एकत्र यावे, असे आवाहनही त्यांनी केले. शिष्टमंडळाने जाऊन निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके यांना निवेदन सादर केले. तसेच मोर्चेकºयांच्या भावना केंद्रीय गृहमंत्र्यांपर्यंत, शासनापर्यंत पोहोचविण्याची मागणी केली.सर्वपक्षीयांचा सहभागया मोर्चात भाजपाचे आमदार सुरेश भोळे, महापौर सीमा भोळे, उपमहापौर डॉ.अश्विन सोनवणे, औरंगाबादचे किशोर शितोळे, भाजपाचे मनपा गटनेते भगत बालाणी, शिवसेनेचे विरोधी पक्षनेते सुनील महाजन, नगरसेवक प्रशांत नाईक, अ‍ॅड.शुचिता हाडा, दीपमाला काळे, भारती सोनवणे, मुकुंद सोनवणे, चेतन सनकत, गायत्री राणे, किशोर बाविस्कर, जितेंद्र मुंदडा, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष सचिन नारळे, विहिंपचे ललित चौधरी, देवेंद्र भावसार, राष्टÑीय स्वयंसेवक संघाचे मंगलसिंग परदेशी, बजरंग दलाचे आकाश पाटील, माजी नगरसेवक यशवंत पटेल, राजकुमार अडवाणी, किशोर चौधरी, किशोर भोसले, अतुलसिंह हाडा, अतुल बारी, पिंटू काळे, धुडकू सपकाळे, फारूक शेख, चंदन कोल्हे, अरविंद देशमुख, राष्टÑवादीचे महानगर जिल्हाध्यक्ष नामदेवराव चौधरी, सविता बोरसे, तसेच श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाज हितवर्धक संस्था, सद्गुरू एज्युकेशन सोसायटीचे शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे विद्यार्थी, महिला व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

टॅग्स :Morchaमोर्चाJalgaonजळगाव