शहरं
Join us  
Trending Stories
1
"होय, मी चुकलो! आता प्रायश्चित्त म्हणून..."; भाजपाचे संबित पात्रा यांनी मध्यरात्री पोस्ट केला व्हिडीओ
2
वरळीतील शिवसैनिकाचा मृत्यू, अरविंद सावंत संतापले; निवडणूक आयोगाला धरलं जबाबदार
3
भटकता आत्मा, मोदींची ऑफर अन् बिनशर्त पाठिंबा; लोकसभा निवडणुकीचा फड राज्यात गाजला
4
चूक कोणाची? पोर्शे कंपनीची की आरटीओची? ती कार नोंदणी न करताच रस्त्यावर धावत होती
5
"सचिनच्या जाहिरातीमुळे त्याच्या सुरक्षारक्षकाचा जीव गेला"; गंभीर आरोप करत बच्चू कडूंचा आंदोलनाचा इशा
6
गुरुवारी ‘हे’ स्तोत्र म्हणा, गुरुबळ मिळवा; धनवृद्धी, सुख-समृद्धी योग शक्य, होईल गुरुकृपा!
7
एक राजयोग, चौपट लाभ: ६ राशींची इच्छापूर्ती, सरकारी कामात यश; व्यापारात नफा, प्रमोशन शक्य!
8
'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन! पण महेश मांजरेकर नाही तर 'हा' अभिनेता करणार होस्ट
9
काय आहे F&O ट्रेडिंग, किरकोळ गुंतवणूकदारांच्या वाढत्या संख्येबाबत सरकार का देतेय इशारा?
10
आमिर खान नाही तर सलमान खान होता 'गजनी'साठी पहिली पसंती, या कारणामुळे भाईजानचा पत्ता झाला कट
11
बिहारच्या सारणमध्ये मतदानाच्या दुसऱ्या दिवशी हिंसा, गोळीबार; एकाचा मृत्यू, दोन जखमी
12
कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरण: बिल्डर विशाल अगरवालला अखेर अटक; पुणे पोलिसांची कारवाई
13
लोकसभा : संसदेची सुरक्षा CRPF कडून CISF ने ताब्यात घेतली; कारण काय...
14
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियामध्ये तेजी, नेस्ले घसरला
15
कार्तिक आर्यनसोबत हेमांगी कवी शेअर करणार स्क्रीन; 'चंदू चॅम्पियन'मध्ये साकारतेय महत्त्वाची भूमिका
16
भाजपवर एवढे नाराज की, खासदाराने मतदानही केले नाही; प्रचार तर दूरच... पक्षाने नोटीस धाडली
17
'निवडणूक आयोगाचे मोदींच्या घरगड्यासारखे काम'; उद्धव ठाकरेंच्या आरोपानंतर भाजपने दाखल केली तक्रार
18
इराणच्या राष्ट्रपतींचा अपघात झाला की घातपात? हेलिकॉप्टर अपघाताचे हे आहे रहस्य
19
मुंबईत मतदान केंद्रावर ठाकरे गटाच्या बूथ एजंटचा धक्कादायक मृत्यू; टॉयलेटमध्ये आढळला मृतावस्थेत
20
RBI गव्हर्नर की SBI प्रमुख; कोणाचं वेतन आहे जास्त, पाहा कोणाचं किती आहे शिक्षण?

पाचोऱ्यात बीएसएनएलची सेवा ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 12:21 AM

पाचोरा : येथे गेल्या आठ दिवसांपासून बीएसएनएलची सेवा ठप्प झाल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यात शासनाने बहुतेक शासकीय कामे आॅनलाईन केल्यामुळे या त्रासाची तिव्रता वाढली आहे.

ठळक मुद्देजळगाव- चांदवड रस्ता कामामुळे केबल तुटलीबीएसएनएल व ठेकेदारात समन्वय नसल्याची तक्रार

पाचोरा : शासनाने सर्वच कामे आॅनलाईन केली असल्याने इंटरनेटवर अवलंबून राहावे लागत असताना बीएसएनएलची सेवा आठवडाभरापासून कोलमडल्याने पाचोरा तालुक्यातील जनता त्रस्त झाली आहे.जळगाव- चांदवड या राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम सद्या सुरू आहे. या बांधकामाचा ठेका घेतलेल्या कंपनीने सदर रस्त्याचे खोदकाम बºयाच ठिकाणी सुरू ठेवले असल्याने त्यात बीएसएनएलची केबल तुटल्याने वारंवार सेवा खंडित होऊन मोठी समस्या निर्माण होत आहे. पाचोरा शहरातील बँक सेवा, शासकीय कार्यालय, खाजगी आस्थापने, छोटे उद्योग याठिकाणी बीएसएनएलची नेट सेवा आहे. नागरिकांना ह्याच ठिकाणी आर्थिक व्यवहार, व्यापार, आॅनलाइन करावा लागतो.मात्र रस्त्यांच्या कामामुळे केबल फॉल्ट होऊन कामकाज ठप्प होत आहे.परिणामी जनतेचे आर्थिक नुकसान होऊन वेळ व पैशाचा भुर्दंड सहन करावा लागत आहे.शासकीय कामकाज ठप्पगेल्या आठवडाभरापासून बीएसएनएल सेवा विस्कळीत झाल्याने दुय्यम निबंधक कार्यालयात मिळकतीचे दस्त नोंदणी थांबली आहे. दररोज पक्षकारांना दस्तऐवज नोंदणी साठी दिवसभर नेटसेवा सुरू होण्याची वाट पहावी लागत असल्याने अनेकांचे व्यवहार रद्द झाल्याच्या तक्रारी आहेत.दस्तऐवज घेऊन नंबर लावण्यासाठी पक्षकार व स्टॅम्प वेंडर पहाटे ४ वाजेपासून दुय्यम निबंधक कार्यालय गेटवर हजर असतात .मात्र नेटसेवेचा भरवसा नसल्याने कामे होत नाहीत .७/१२देखील मिळू शकत नसल्याने नागरिक हैराण झाले आहे.बीएसएनएल व ठेकेदार यांच्यात समन्वय नाहीरस्त्याचे काम सुरू झाल्यापासून अनेकदा समस्या उदभवल्या असतानाही समन्वयाअभावी कामकाजात सुधारणा होत नाही. यापुढे समस्या निर्माण झाल्यास नागरिक रस्त्यावर येतील अशी भावना निर्माण झाली आहे. याची बीएसएनएल व संबंधीत कंपनीने दखल घ्यावी व सेवा तात्काळ सुरळीत करावी अशी आम जनतेची मागणी आहे. 

टॅग्स :BSNLबीएसएनएल