शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या वादातून तरुणाचा निर्घूण खून, दोन जण जखमी 

By विजय.सैतवाल | Updated: December 10, 2023 22:05 IST

समतानगर परिसरातील वंजारी टेकडीवर घडली. 

विजयकुमार सैतवाल, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव : गेल्या काही वर्षांपासून असलेले आपसातील वाद पुन्हा उफाळून आल्यानंतर अरुण बळीराम सोनवणे (२८, रा. समता नगर) या तरुणाला बोलवून त्याच्यावर चॉपरने सपासप वार करत त्याचा निर्घूण खून करण्यात आला. या वेळी त्याच्या सोबत असलेल्या आशीष संजय सोनवणे व भावाला वाचविण्यासाठी गेलेला गोकूळ बळीराम सोनवणे यांच्यावरही वार करण्यात आल्याने हे दोघेजण गंभीर जखमी झाले आहे. ही घटना रविवार, १० डिसेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास समतानगर परिसरातील वंजारी टेकडीवर घडली. 

समतानगर परिसरात जुन्या वादातून रविवारी सकाळी अरुण व काही तरुणांमध्ये पुन्हा वाद उद्धभवला होता. त्यावेळी हा वाद काहींच्या मदतीने मिटवण्यात आला होता. परंतु दुपारी ३ वाजता पुन्हा हा वाद उफाळून आल्याने वाद झालेल्या तरुणांनी अरुण सोनवणे याला समता नगरातील वंजारी टेकडी येथे बोलवले. अरुण सोनवणे हा टेकडीवर गेल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याचा मोठा भाऊ गोकुळ सोनवणे हादेखील तिथे धावत गेला. तोवर मारेकऱ्यांनी अरुणवर चॉपरने सपासप वार करण्यास सुरुवात केली. यामध्ये अरुण सोनवणे यांच्या गळ्यावर, छातीवर पाठीवर, मानेवर तीक्ष्ण हत्याराने वार केले तर सोबत असलेला आशीष संजय सोनवणे याच्यावरही वार करण्यात आले. भावावर होत असलेले वार रोखण्यासाठी गेल्याने गोकुळ बळीराम सोनवणे याच्याही हातावर जखमा झाल्या.  घटनेनंतर तिघांनाही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता अरुण सोनवणे याला मयत घोषित करण्यात आले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी