शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

सततच्या भांडणातून भावाने केला लहान भावाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2019 11:54 IST

दारुच्या नशेत व्हायचे सतत वाद

जळगाव : दारुच्या नशेत सतत होणाऱ्या वादातून मोठ्या भावाने नशेत लहान भावाचा डोक्यात लाकडी दांडा टाकून खून केल्याची घटना शनिवारी सकाळी ५.३० वाजेच्या सुमारास पिंप्राळा हुडको भागात घडली. दीपक प्रल्हाद मरसाळे (२५) असे मृताचे नाव असून संशयित जय मरसाळे याला पोलिसांनी अटक केली आहे.वडील प्रल्हाद तानकू मरसाळे यांच्या फिर्यादीवरुन मुलगा जय याच्याविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, प्रल्हाद मरसाळे यांना तीन मुले आहेत. मोठा मुलगा विजय हा जैनाबाद परिसरात आपल्या कुटुंबासह राहतो. तर जय प्रल्हाद मरसाळे (३५) आणि दीपक प्रल्हाद मरसाळे (२५) हे पिंप्राळा हुडको परिसरातील मातंग वाड्यात एकत्र राहतात. त्यांचा घराच्या बाजूला प्रल्हाद मरसाळे भाड्याच्या घरात राहतात. शुक्रवारी रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास जय आणि दीपक यांनी घरी एकत्र जेवण केले. जय मरसाळे याला दारू पिण्याची सवय आहे.दरम्यान, दोघा भावांमध्ये किरकोळ वाद सुरू होता. मध्यरात्रीच्या सुमारास जय याचे लहान भाऊ दीपक याच्याशी वाद झाला. त्यात डोक्यात लाकडी दांडा टाकल्याने दीपकचा मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळाल्यानंतर सहायक पोलीस अधीक्षक डॉ.नीलाभ रोहन, रामानंद नगर पोलीस स्टेशनचे निरीक्षक अनिल बडगुजर व सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा केल्यानंतर मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला. दरम्यान संशयित आरोपी जय मरसाळे याला सकाळी ७ वाजेच्या सुमारास ताब्यात घेण्यात आले.फाशी घेतल्याचा बनावया घटनेनंतर जय याने सकाळी वडीलांचे घर गाठून भाऊ दीपक याने फाशी घेतली असून तो मृत झाला आहे असे वडीलांना सांगितले. त्यामुळे घाबरलेल्या वडीलांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली असता दीपक याच्या डोक्यातून रक्तस्त्राव आलेला होता तसेच जमिनीवरही रक्त पडलेले होते. कापडाने हे रक्त पुसल्याचे दिसून येत होते. नेहमी दोन्ही भावांमध्ये दारुच्या नशेत वाद होत असल्याने यश यानेच दीपकला मारल्याची फिर्याद वडीलांनी दिली. त्यानुसार रामानंद नगर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव