शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात शेफ विष्णू मनोहर यांच्या पुढाकाराने वांग्याचं विक्रमी भरीत शिजणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2018 11:59 IST

खान्देशी वांग्याचे भरीत जगप्रसिद्ध करण्यासाठी महाराष्ट्राचे सुप्रसिध्द शेफ विष्णू मनोहर यांनी २१ डिसेंबर रोजी जळगावातील सागर पार्क मैदानावर मराठी प्रतिष्ठानच्या सहकार्याने २५०० किलो भरीत बनविण्याचा विश्वविक्रमला सुरुवात केली आहे.

ठळक मुद्देशेफ विष्णू मनोहर यांनी २१ डिसेंबर रोजी जळगावातील सागर पार्क मैदानावर २५०० किलो भरीत बनविण्याचा विश्वविक्रमला सुरुवात केली.विश्वविक्रमाची नोंद गिनीज बुक्स आॅफ वर्ल्डमध्ये करण्यात येणार आहे.यावल तालुक्यातील बामणोद येथे भरीताच्या वांग्यांची उपलब्धता झाली.

जळगाव : खान्देशी वांग्याचे भरीत जगप्रसिद्ध करण्यासाठी महाराष्ट्राचे सुप्रसिध्द शेफ विष्णू मनोहर यांनी २१ डिसेंबर रोजी जळगावातील सागर पार्क मैदानावर मराठी प्रतिष्ठानच्या सहकार्याने २५०० किलो भरीत बनविण्याचा विश्वविक्रमला सुरुवात केली आहे. सकाळी ५.३० वाजता वांगे भाजण्यास सुरुवात झाली. विश्वविक्रमाची नोंद गिनीज बुक आॅफ वर्ल्डमध्ये करण्यात येणार आहे.

भरीत बनविण्यासाठी कोल्हापुरात कढई तयार केली गेली. यावल तालुक्यातील बामणोद येथे भरीताच्या वांग्यांची उपलब्धता झाली. सागर पार्क येथे  पाच ते सहा हजार नागरिक हा विक्रम बघू शकणार आहेत, अशी व्यवस्था आहे. भरीत बनविण्यासाठी कोल्हापूर येथे ४५० किलो वजनाची कढई तयार केली गेली ती १० बाय १० फुटाची असून तीन फुट खोल आहे. भरीत बनविण्यासाठी लागणारा सराटा ११ फुट लांब असणार आहे. गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डनुसार भरीत बनविताना कुठल्याही यंत्राचा वापर होणार नाही. ही प्रक्रिया करत असताना कढईजवळ स्वत: मी आणि देवराम भोळे व दत्तु चौधरी यांच्यापैकी एक जण सोबत असल्याचे मनोहर यांनी सांगितले. पहाटे ५ वाजेपासून भरीताचे वांगे भाजण्याला सुरुवात झाली.  पारंपरिक पध्दतीने ही संपूर्ण प्रक्रिया केली जात आहे. 

२० डिसेंबर रोजीच बामणोद येथून वांगे आणली  आहेत. विक्रमासाठी ३२०० किलो वांगे, १२० किलो तेल सामग्री आधीच मैदानावर उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे मराठी प्रतिष्ठानचे अ‍ॅड. जमिल देशपांडे यांनी सांगितले. या संपूर्ण उपक्रमासाठी ६० महिला, ४० पुरूष तसेच २० सुपरवायझर, २ मुख्यनिरीक्षक असे मनुष्यबळ तैनात आहे़ ४००० किलो पेलणारी चुल भरीत बनविण्यासाठी ४००० किलो वजन पेलणारी चुल तयार करण्यात आली आहे. दोन दिवस चालणाऱ्या या प्रक्रियेचे संपूर्ण व्हिडीओ केले जात आहे, अन् विश्वविक्रमात नोंद घेण्यासाठी पाठविण्यात येणार आहे. शेफ विष्णू मनोहर यांची आकाशवाणी चौकातून  ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढली जाणार आहे. विश्व विक्रमी 2500 किलो भरीताचे होणार विनामूल्य वितरण दुपारी करण्यात येणार आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव