जळगाव : शहरातील शाळा, महाविद्यालये तसेच सामाजिक संस्थांच्या वतीने मंगळवारी कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. नंतर जीवनकार्याची माहिती देऊन त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला.
अखिल भारतीय लेवा विकास महासंघ (२५ सीटीआर ७७)
अखिल भारतीय लेवा विकास महासंघ युवक संघटनेतर्फे कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या जयंतीनिमित्त बहिणाबाई उद्यान येथे त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. स्नेहल फेगडे, बिपीन झोपे, राजेश वारके, एकनाथ पाचपांडे, विक्की काळे, सचिन पाटल, स्वप्निल रडे, गणेश वाणी, शिवाजी राजपूत, मयूर पाटील, राहुल चौधरी, अजित चौधरी, ललित काळे, रोहिदास ठाकूर, राकेश गोसावी, शत्रुघ्न महाजन, अफरोज शेख, नरेंद्र बोरसे, प्रफुल्ल सरोदे, सचिन महाजन, कपिल सोनवणे आदींची उपस्थिती होती.
००००००००००
आसोदा सार्वजनिक विद्यालय (२५ सीटीआर ७९)
असोदा येथील सार्वजनिक विद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका विद्या खाचणे होत्या. सुरुवातीस बहिणाबाई चौधरींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थिनींनी बहिणाबाईंच्या कविता सादर केल्या, तर सचिन जंगले, मंगला नारखेडे, पर्यवेक्षक डॉ.मिलिंद बागुल यांनी बहिणाबाईंच्या साहित्याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली. सूत्रसंचालन अनिता कोल्हे व आभार भावना चौधरी यांनी मानले. यावेळी ज्येष्ठ शिक्षक एल.जे. पाटील, डी.जी. महाजन उपस्थित होते.
०००००००००००
बहिणाबाईंच्या स्मारकासाठी जनआंदोलनाचा निर्धार (२५ सीटीआर ७८)
कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे त्यांच्या माहेरातील स्मारक हे प्रशासकीय व राजकीय दुर्लक्षतेमुळे अर्धावस्थेत पडून आहे. स्मारकाचे निर्माण हे केवळ स्वप्नच राहू नये, यासाठी स्मारकाच्या निधीसाठी ग्रामस्थांतर्फे जनआंदोलन छेडण्याचा निर्धार मंगळवारी कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या जयंतीनिमित्त करण्यात आला. आसोदा येथील त्यांच्या माहेरातील वाड्यात त्यांना अभिवादनही करण्यात आले.
बहिणाबाईंच्या स्मारकाचे बांधकाम ५० टक्के पूर्ण झाले आहे. मागील चार वर्षांपासून निधीअभावी बांधकाम बंद आहे. यामुळे स्मारकाला गवताने वेढले आहे. वारंवार निवेदने देऊनही राजकीय पदाधिकारी व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्षच केले आहे. यामुळे स्मारकाला निधी उपलब्ध करून बांधकाम सुरू करण्यासाठी लोकवर्गणीतून निधी उभारण्याचाही ठराव यावेळी ग्रामस्थांनी केला. स्मारक विकास समितीने यासाठी पुढाकार दर्शविला आहे. याविषयी समितीचे अध्यक्ष किशोर चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले. सरपंच अनिता कोळी यांनी बहिणाबाईंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. युनियन बॅंक व्यवस्थापक श्रीपाद ठाले, पंचायत समिती सदस्या ज्योती महाजन, उपसरपंच वर्षा भोळे, सदस्य सुनील पाटील, रविकांत चौधरी, योगीता नारखेडे यांच्यासह स्मारक समितीचे उपाध्यक्ष प्रदीप भोळे, सदस्य महेश भोळे, संजय महाजन, नितीन चौधरी, तुषार महाजन, खेमचंद महाजन, अजय महाजन, संदीप नारखेडे, गिरीश भोळे आदी उपस्थित होते.
००००००००००
राज प्राथमिक शाळा
मेहरूण परिसरातील राज प्राथमिक-माध्यमिक विद्यालय व डॉ. सुनील महाजन महाविद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची जयंती साजरी करण्यात आली. मुख्याध्यापक चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. त्यानंतर व्ही.डी. नेहते यांनी बहिणाबाईंच्या जीवनकार्याबद्दल माहिती दिली. सूत्रसंचालन एस.ए. पाटील यांनी केले, तर आभार डी.वाय. बऱ्हाटे यांनी मानले.