शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

प्रेयसीने लग्नाला नकार दिल्याने प्रियकराने जळगावात घेतला गळफास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 21:05 IST

भाजपाचा मंडळ उपाध्यक्ष असलेल्या प्रियकराची खंडेराव नगरात आत्महत्या

ठळक मुद्देआत्महत्येनंतर पोलिसांनी चिठ्ठी व मोबाईल केला जप्तऐनवेळी लग्नास दिला नकार दिल्याने उचलले टोकाचे पाऊलमयत धीरज हा भाजपा मंडळ- ५ चा उपाध्यक्ष

आॅनलाईन लोकमतजळगाव, दि.२७ : प्रेयसीने लग्नास नकार दिल्याने धीरज पद्माकर चौधरी (वय २६) या तरुणाने राहत्या घरात पंख्याला दोरी बांधून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी अडीच वाजता उघडकीस आली. आत्महत्येपूर्वी धीरज याने तीन पानांची चिठ्ठी लिहिलेली असून पोलिसांनी ही चिठ्ठी जप्त केली आहे. दरम्यान, धीरज हा भाजपा मंडळ- ५ चा उपाध्यक्ष होता.याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, धीरज हा विसनजी नगरातील मंदार डिस्ट्रीब्युटर्स या होलसेल औषध विक्रीच्या दुकानावर कामाला होता. मंगळवारी दुपारी १ वाजेपर्यंत तो कामावर होता. तेथून घरी गेल्यानंतर पंख्याला दोरी बांधून त्याने दीड वाजेच्या सुमारास गळफास घेतला. आई सुनंदा व वडील पद्माकर रघुनाथ चौधरी हे भुसावळ येथे नातेवाईकाकडे साखरपुड्याच्या कार्यक्रमाला गेले होते. दुपारी अडीच वाजता ते घरी आले असता पहिल्या खोलीत वडील शर्ट काढायला लागले तर दुसºया खोलीत आई गेली असता धीरज याने गळफास घेतल्याचे दिसून आले.दरम्यान, रामानंद नगर पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याच्या खिशात तीन पानांची चिठ्ठी आढळून आली. ही चिठ्ठी व मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतला तर हातातील अंगठ्या व पाकीट पालकांना परत केले. त्यानंतर मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. सायंकाळी शवविच्छेदन झाल्यानंतर साडे सात वाजता धीरजवर अंत्यसंस्कार करण्यात आले.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धीरज याचे एका नर्स असलेल्या तरुणीशी प्रेमसंबंध होते. दोन्हीही एकाच समाजाचे असल्याने धीरजच्या घरातून लग्नास होकार होता. मुलीचाही या लग्नास होकार होता, मात्र ऐनवेळी कुटुंबातून नकार मिळाल्याने तसा निरोप तिने धीरजला दिला होता, त्यामुळे धीरज प्रचंड तणावाखाली आला होता. त्यातूनच त्याने आत्महत्येचा निर्णय घेतला. आत्महत्या करण्यापूर्वी धीरज याचे प्रेयसीशी बोलणे झाले आहे.

टॅग्स :JalgaonजळगावSuicideआत्महत्या