रुग्णांच्या बॅगेतही मद्याच्या बाटल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2020 12:54 PM2020-07-15T12:54:14+5:302020-07-15T12:54:36+5:30

जळगाव : अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहात असलेल्या कोविड व क्वारंटाईन केअर सेंटरमध्ये मद्यप्राशन करून गोंधळ घालणाऱ्या दोन्ही रुग्णांच्या बॅगेची झडती ...

Bottles of alcohol in the patient's bag | रुग्णांच्या बॅगेतही मद्याच्या बाटल्या

रुग्णांच्या बॅगेतही मद्याच्या बाटल्या

Next

जळगाव : अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहात असलेल्या कोविड व क्वारंटाईन केअर सेंटरमध्ये मद्यप्राशन करून गोंधळ घालणाऱ्या दोन्ही रुग्णांच्या बॅगेची झडती घेतली असता दारूच्या दोन बाटल्या आढळून आल्या.
अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहात मनपाच्यावतीने कोविड व क्वारंटाईन केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणी अनेक रुग्ण व संशयित रुग्ण मद्याचे घोट रिचवत असल्याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर याठिकाणच्या सुरक्षा रक्षकांना महापौरांनी प्रत्येक रुग्णांवर लक्ष ठेवण्याचा सूचना दिल्या होत्या. त्यानंतर मंगळवारी दोन कोरोना बाधितांनी मद्याचे घोट रिचवत कोविड केअर सेंटरमध्ये चांगलाच गोंधळ घातला.
दोघांनी मागितली माफी
कोविड केअर सेंटरमधून याबाबत एका रुग्णाने महापौर भारती सोनवणे यांच्याकडे तक्रार केली असता महापौर त्याठिकाणी पोहचल्या. यावेळी नगरसेवक कैलास सोनवणे व शिवसेनेचे गटनेते अनंत जोशी देखील त्यांच्यासोबत होते. महापौरांनी माहिती घेत दोन्ही रुग्णांना समोर येण्यास सांगितले. सर्व यंत्रणा आल्यामुळे दोन्हीही रुग्ण महापौरांसमोर आल्यानंतर दोन्ही रुग्णांनी माफी मागायला सुरुवात केली. महापौर व इतर नगरसेवकांनी दोन्ही रुग्णांची चांगलीच खरडपट्टी काढली.

रिक्षातही मद्यच्या बाटल्या
महापौरांनी सेंटरसमोर असलेल्या रिक्षात तपासणी करायला लावली असता त्यात आणखी दोन दारूच्या बाटल्या सापडल्या. महापौरांनी याबाबत त्याठिकाणी असलेल्या पोलीस कर्मचाºयाला सर्व व्हिडीओ चित्रीकरण पुरावा म्हणून जपून ठेवण्यास सांगितले. दरम्यान, मनपाचे डॉक्टर, सहकारी आणि सुरक्षारक्षकांशी गैरवर्तन केल्याने दोघांची रवानगी जिल्हा रुग्णालयाच्या कोविड सेंटरमध्ये करण्यात आली आहे.

डब्यांमधून पाठविली जातोय गुटखा
- मनपाच्या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल झालेल्या रुग्णांना डब्ब्यातून अनेक नातेवाईक गुटखा व इतर अमलीपदार्थ पुरवित असल्याचीही तक्रार काही रूग्णांनी यावेळी महापौरांकडे केली. काही दिवसांपूर्वी विलगीकरण कक्षात तंबाखूजन्य पदार्थ सापडले होते. कोविड सेंटरमध्ये रुग्णांची यापुढे अचानक तपासणी करण्यात येणार असून कोणाकडेही अमली पदार्थ आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. गोंधळ घालणाºया दोघांवर गुन्हा दाखल करण्यासाठी मनपा आयुक्तांना सांगितले असल्याची माहिती महापौर भारती सोनवणे यांनी दिली आहे.

Web Title: Bottles of alcohol in the patient's bag

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.