शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा राष्टÑवादीच्याच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 12:29 IST

जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.रवींद्र पाटील यांची माहिती

ठळक मुद्देकॉँग्रेसचा दावा चुकीचासमन्वयातून जागा वाटप व्हावे

जळगाव : लोकसभेच्या दोन्ही जागा या राष्टÑवादी कॉँग्रेसच्याच असून कॉँग्रेसकडून त्याबाबत चुकीचा दावा केला जात असल्याची माहिती राष्टÑवादी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पाटील यांनी मंगळवारी पत्रकारांना दिली.राष्टÑवादी कॉँग्रेसच्या मुंबईतील बैठकीत लोकसभेच्या जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघाबाबत इच्छुकांची चाचपणी पक्षाचे राष्टÑीय अध्यक्ष खासदार शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. त्यात काही जणांच्या समर्थकांनी दोन्ही मतदार संघातील इच्छूकांची नावे सांगितली. याप्रश्नी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. संदिप पाटील यांनी दोन पैकी लोकसभेची एक जागा कॉँग्रेस लढवेल असे सांगितले होते. याबाबत बोलताना अ‍ॅड. रवींद्र पाटील म्हणाले, दोन्ही जागा या राष्टÑवादीकडे आहेत. यासंदर्भात काही निर्णय घ्यायचा असल्यास पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार हे घेतील. दोन्ही जागा लढवाव्यात अशी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची भावना आहे.१५ दिवसात दुष्काळाबाबत निर्णय न झाल्यास राष्टÑवादी कॉँग्रेसतर्फे प्रत्येक तहसील कार्यालयासमोर आंदोलन केले जाईल, असा इशारा अ‍ॅड.पाटील यांनी दिला.समन्वयातून जागा वाटप व्हावे : डॉ.चौधरीसमन्वयातून लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या जागांचे वाटप करावे असे आवाहन कॉँग्रेसचे महानगर कार्याध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांनी एका निवेदनाद्वारे केले आहे. येत्या सहा महिन्यात लोकसभेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. वरिष्ठ पातळीवरून काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडी एकत्र लढण्याचे संकेतच नव्हे तशी तयारी सुरू केली आहे. या स्थितीत जळगाव जिल्ह्यातील लोकसभा मतदार संघाच्या दोन्ही जागांवर राष्टÑवादी कॉँग्रेसने दावा केला आहे. याप्रश्नी समन्वयातून निर्णय व्हावा असे आवाहन डॉ. चौधरी यांनी केले आहे. रावेर लोकसभा मतदार संघात कॉँग्रेसचे प्राबल्य आहे तर जळगाव लोकसभा मतदार संघात राष्टÑवादी कॉँग्रेसचे प्राबल्य आहे. हे लक्षात घेऊन यात समन्यवरातून तोडगा निघावा अशी अपेक्षा डॉ. चौधरी यांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसJalgaonजळगाव