शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

अहिल्याबाई होळकर पुरस्काराने दोघींचा गौरव; कोविडमुळे अनाथ झालेल्या पालकांना मुदत ठेव प्रमाणपत्र वाटप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2023 13:25 IST

कोविडमुळे अनाथ झालेल्या पालकांच्या नावे असलेल्या ५ लाखांच्या ठेव प्रमाणपत्रांचे वाटपही करण्यात आले.

- कुंदन पाटील

जळगाव :  पहूर कसबे येथील इंदिरा विश्वनाथ वानखेडे व अमळनेर येथील जयश्री साळुंखे यांचा जिल्हाधिकारी व जि.प.सीईओंच्याहस्ते अहिल्याबाई होळकर पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी कोविडमुळे अनाथ झालेल्या पालकांच्या नावे असलेल्या ५ लाखांच्या ठेव प्रमाणपत्रांचे वाटपही करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी अमन मित्तल होते. जि.प.सीईओ पंकज आशिया, बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा देवयानी गोविंदवार, सदस्य संदीप पाटील, वृशाली जोशी, वैशाली विसपुते, विद्या बोरनारे आदी उपस्थित होते. 

जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी डॉ.वनीता सोनगत यांनी प्रास्ताविक केले.  सुरुवातीला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार (२०१३-१४) प्राप्त. इंदिरा विश्वनाथ वानखेडे (रा.पहूर कसबे ता.जामनेर) व २०१४-१५ च्या पुरस्कारार्थी जयश्री साळुंखे (अमळनेर) यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यानंतर कोविडमुळे अनाथ झालेल्या १२ पालकांना राज्य शासनाच्या ५ लाखांच्या मुदतठेव योजनेचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.

सूत्रसंचालन सारिका मेतकर यांनी केले. जिल्हा परीविक्षा अधिकारी एस.आर.पाटील, अधीक्षक आर.पी. पाटील, परीविक्षा अधिकारीमहेंद्र पाटील, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी योगेश एस. मुक्कावार, निरीक्षण गृहाच्या जयश्री पाटील, रविकिरण  अहिरराव यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :Jalgaonजळगाव