शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

चोपड्यात सलग दुसऱ्या दिवशी दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 23:14 IST

बुधवारी प्राप्त अहवालात सात मृतांमध्ये चोपडा तालुक्यातील दोन महिला तसेच भुसावळ, भडगाव, चाळीसगाव व जळगाव येथील बाधितांचा समावेश आहे. 

ठळक मुद्देजिल्हयात ९९६ बाधित : ६१७ जणांचे अहवाल अद्यापही बाकीच, बाधितांमध्ये वाढ सुरुच

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्हयात कोरोसा संसर्गामुळे मृत्यूचे थैमान सुरूच असून बुधवारी प्राप्त अहवालात सात मृतांमध्ये चोपडा तालुक्यातील दोन महिला तसेच भुसावळ, भडगाव, चाळीसगाव व जळगाव येथील बाधितांचा समावेश आहे. 

जिल्हयात गत सप्ताहापासून कोरोनाच्या बाधितांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. रोज नऊशे ते हजाराच्या जवळपास बाधित आढळत असल्याने चिंतेच वातावरण आहे. 

जिल्हयात सातत्याने वाढ

जिल्ह्यात आजचा मृत्यूदर हा १.९९ टक्के आहे तर गेल्या आठवड्यात तो २.१५ टक्के होता. जिल्ह्यात आतापपर्यंत १४६२ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. मात्र रिकव्हरी दर हा ८६.३९ टक्के आहे. जिल्ह्यात बुधवारी पाप्त माहिती नुसार सात जणाचा मृत्यू झाला. त्यापैकी चोपड्यातील ५७ व ८८ वर्षीय महिलांचा समावेश आहे. तसेच जळगाव शहरातील ६५ वर्षीय महिला, भुसावळ तालुक्यातील ८१ वर्षीय पुरूष, भडगाव तालुक्यातील ७८ वर्षीय पुरूष, चाळीसगाव तालुक्यातील ७१ वर्षीय व अमळनेर तालुक्यातील ७१ वर्षीय पुरूषाचा मृतांमध्ये समावेश आहे. 

पाचोरा शहरात उद्यापासून तीन दिवसांचा कर्फ्यू

पाचोरा : कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यातील वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार पाचोरा शहरात तीन दिवस जनता कर्फ्यू पाळण्यात येणार आहे. दि १९,२० व २१ रोजी पाचोरा शहर पूर्णपणे लॉकडाउन करण्यात येणार असल्याचे आदेश प्राप्त झाल्याने नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन पाचोरा प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांनी केले आहे.दुसऱ्या टप्प्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पाचोरा तालुक्यात गेल्या आठ दिवसात २००पेक्षा जास्त कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढली आहे. यामुळे जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार शुक्रवार, शनिवार व रविवार या तीन दिवसात पाचोरा शहरात पूर्णपणे लॉकडाऊन पाळला जाणार आहे. यात भाजीपाला दुकाने, हॉटेल्स, टपऱ्या, किराणा दुकान, स्टेशनरी, कटलरी, कापड दुकान यासह शासकीय कार्यालयात अत्यल्प उपस्थिती, शाळा महाविद्यालय, क्लासेस, रस्ते वाहतूक, उपाहारगृहे, आठवडे बाजार, शासकीय व धार्मिक कार्यक्रम पूर्णपणे बंद राहणार असून विवाह समारंभदेखील न करण्याचे आदेशात नमूद केले आहे. पाचोरा शहरात दररोज सरासरी २५ रुग्णांची भर पडत असून खाजगी व शासकीय कोविड सेंटरदेखील सुरू करण्यात आले आहे. नागरिकांनी घराबाहेर न पडता पूर्णपणे लॉकडाऊन पाळावा, असे आवाहन पाचोरा उपविभागाचे प्रांतधिकारी राजेंद्र कचरे यांनी केले आहे. लॉकडाऊनचे नियम व कोरोना प्रतिबंधक उपायांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल व गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशाराही प्रांताधिकारी यांनी दिला आहे.

टॅग्स :Jalgaonजळगावcorona virusकोरोना वायरस बातम्या