शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

जळगावातील मेहरुण बोरांचा हंगाम कमी पावसामुळे लांबणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 12:04 IST

जैन हिल्सवर ५० वर्षे जुन्या झाडांचे संवर्धन

विजयकुमार सैतवाल

जळगाव : मेहरुणच्या बोरांचे उत्पादन यंदा कमी पावसामुळे लांबणीवर पडले असून डिसेंबर महिना उजाडला तरी ही बोरं पुरेशा प्रमाणात बाजारात आलेली नाही. दरवर्षी नोव्हेंबरच्या दुसऱ्या-तिस-या आठवड्यात येणाºया या बोरांची यंदा वरुणराजाच्या वक्रदृष्टीमुळे खवय्यांना प्रतीक्षा करावी लागत आहे.राज्यभरात मागणीजळगावातील मेहरुण परिसरात शेकडो वर्षांपासून मेहरुण बोरं पिकतात. या परिसरात मोठ्या प्रमाणात या बोरांची झाडे असल्याने त्यांचे नाव मेहरुणची बोरं पडली. या बोरांना मोठी मागणी असल्याने व्यापारी वर्ग येथे थेट झाडांची बोली लावून ठराविक क्षेत्रफळातील झाडे घेऊन तेथील बोरांची विक्री करतात. एकदा हे बोरं खाल्ले की ते पुन्हा प्रत्येक जण मागणारच अशी ख्याती असलेल्या या बोरांना राज्यभरात मागणी वाढली. त्यामुळे जळगाव जिल्ह्यासह परिसरातील जिल्हे तसेच मुंबई, पुणे येथेही ही बोरं पोहचली. आजही त्यांना राज्यभरात मागणी असल्याचे व्यापाºयांनी सांगितले.पावसाने दिला फटकायंदा उशिरा आलेला पाऊस व मध्यंतरी पडलेला खंड या मुळे इतर पिकांसह मेहरुणच्या बोरांनाही फटका बसला आहे. पुरेसा पाऊस झाल्यास ही बोर नोव्हेंबर महिन्यातच बाजारात दाखल होतात. मात्र यंदा डिसेंबर महिना उजाडला तरी ही बोर दिसत नसल्याने ग्राहक या बोरांची विचारणा करीत आहे. पाऊस उशिरा आल्याने वेळेवर पाणी मिळाले नाही वबोरांचे उत्पादनही लांबणीवर पडले असल्याचे सांगितले जात आहे.बोरं नामशेष होण्याच्या मार्गावरयंदा पावसामुळे या बोरांचे उत्पादन घटले आहे, सोबतच दिवसेंदिवस या बोरांच्या झाडांची संख्याही कमी होत असल्याने बोरांची आवक कमी होत आहे. मेहरुण परिसरात ज्या भागात या बोरांची झाडे होती त्या भागात दिवसेंदिवस प्लॉट पाडले जाऊन रहिवास क्षेत्र वाढत आहे. परिणामी झाडांची संख्या कमी होऊन ही बोर नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याचे या भागातील रहिवाशांनी सांगितले.केवळ २५ शेतकºयांकडे झाडे शिल्लकमेहरुण परिसरात असलेल्या प्रत्येक शेतात मेहरुण बोरांची झाडे होती. त्यामुळे या मुळे या परिसरातील रहिवाशांचा मेहरुण बोरांची विक्री हाच प्रमुख व्यवसाय होता. मात्र दिवसेंदिवस या बोरांच्या झाडावर कुºहाड चालविली जात असल्याने आज केवळ २५ शेतकºयांच्या शेतात ही झाडे शिल्लक आहे.२५० झाडांचे जतनएकीकडे मेहरुण परिसरात ही बोरं नामशेष होत असताना जैन हिल्स परिसरात या बोरांच्या झाडांचे जतन केले जात आहे. टेकडी परिसरात असलेल्या या उद्योगाच्या उभारणीवेळी तेथे असलेल्या मेहरुण बोरांची झाडे न तोडता ती तशीच टिकवून ठेवली. यातील काही झाडे तब्बल ५० वर्षांपूर्वीची असून त्यांच्यासह जुन्या-नव्या सर्वच झाडांची येथे दररोज देखभाल केली जात आहे. त्या झाडांना दररोज पाणी देणे, त्यांची मशागत करणे अशी सर्व कामे नियमित करून झाडे टिकवून ठेवण्यात आली आहे.शेतकºयांना देणार मेहरुण्या बोरांची रोपंगेल्या वर्षापासून जैन हिल्स परिसरात मेहरुण बोरांची रोप तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले. त्यात यंदा यश आले असून ही रोपे जैन हिल्स परिसरात लावली जाणार आहे. त्यानंतर पुढील वर्षापासून ती शेतकºयांना उपलब्ध करुन दिली जाणार आहेत.यंदा पाऊस लांबल्याने मेहरुण बोरांचा हंगामही लांबला आहे. साधारणत: डिसेंबर महिन्याच्या पहिल्या-दुसºया आठवड्यात ही बोर पुरेशा प्रमाणात बाजारात येतील. जैन हिल्सवर मेहरुणच्या बोरांच्या झाडांचे जतन केले जात आहे.- डॉ. अनिल ढाके, कृषी संशोधन व विकास विभाग, जैन उद्योग समूह.मेहरुण परिसरात पूर्वी प्रत्येक शेतात मेहरुण बोरांची झाडे होती. आता दिवसेंदिवस वाढत्या प्लॉटमुळे झाडांची संख्या कमी होत आहे. त्यामुळे काही दिवसात ही बोरं नष्ट होतात की काय अशी शंका वाटते.- प्रशांत नाईक, नगरसेवक, मेहरुण परिसर.कमी पावसामुळे मेहरुणची बोरं अजून पुरेसा प्रमाणात बाजारात आलेली नाही. त्यामुळे इतर बोर आणून ती विक्री करावी लागत आहे.- योगेश बारी, व्यापारी.

टॅग्स :fruitsफळेJalgaonजळगाव