शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

भुसावळ येथे बोगी व शुध्द जलनिर्मिती प्रकल्पांचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 12:47 IST

डीआरएम आर.के. यादव यांची ‘लोकमत’ भेटीत माहिती

ठळक मुद्दे२५ ठिकाणी भुयारी मार्ग बनवून रेल्वे गेट बंद करणारनवीन गाड्यांचा अद्याप विचार नाही

जळगाव : रेल्वेच्या माध्यमातून भुसावळ येथे ४०० कोटींचा आधुनिक बोगी निर्मिती कारखाना व रेल शुद्ध जल निर्मितीचा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या माध्यमातून मोठी रोजगार निर्मिती होणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाचे मंडल रेल्वे प्रबंधक (डीआरएम) आर. के. यादव यांनी दिली.‘लोकमत’ शहर कार्यालयास त्यांनी बुधवारी सदिच्छा भेट दिली. स्वागत ‘लोकमत’चे निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी, वरिष्ठ महाव्यवस्थापक प्रवीण चोपडा यांनी केले. यावेळी वरिष्ठ मंडळ वाणिज्य प्रबंधक (डीसीएम) सुनील मिश्रा, वरिष्ठ मंडळ अभियंता उत्तर विभाग ( डिईएन) दीपक कुमार, जनसंपर्क अधिकारी जीवन चौधरी उपस्थित होते.२०० एक्सप्रेस व ८० मालगाड्यायावेळी माहिती देताना यादव म्हणाले, रेल्वेमार्गावरील भुसावळ विभाग हा सर्वांत मोठा विभाग असून, इगतपुरीपासून ते अमरावती व मध्यप्रदेशातील खंडवापर्यंतचा भाग भुसावळ विभागात येतो. एकूण १२ जिल्ह्यातील लहान-मोठ्या रेल्वे स्टेशनचा यामध्ये समावेश आहे. सकाळपासून ते रात्रीपर्यंत २४ तासांत या मार्गावर विविध ठिकाणी जाणाऱ्या २०० प्रवासी व ८० मालगाड्या धावतात. दरम्यान सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून भुसावळ विभागात गेल्या वर्षी ६ ठिकाणचे गेट बंद करून या ठिकाणी भुयारी बोगदे तयार केले आहेत. भविष्यात याचप्रमाणे २५ ठिकाणचे रेल्वे गेट बंद केले जातील.२२ स्टेशनवरील फलाटांची उंची वाढणारकाही ठिकणी रेल्वे फलाट आणि रेल्वेच्या दरवाजा पर्यंतची उंची जास्त असल्यामुळे अपघात होत असतात. यासाठी भुसावळ विभागात येणाºया २२ स्टेशनवरील फलाटांची उंची वाढविण्याचे काम सुरू आहे.आधुनिक सीसीटीव्ही कॅमेरेरेल्वे स्टेशन व परिसरातील सुरक्षिततेसाठी अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येत आहेत. साधारणत: एक किलोमीटर पर्यंत त्या व्यक्तीची हालचाल यामध्ये कैद होतील. नाशिक, मनमाड, चाळीसगाव, भुसावळ व बडनेरा या ठिकाणी हे कॅमेरे बसविण्यात आले आहेत. भुसावळला १०८ कॅमेरे बसविले आहेत.दोन मोठे प्रकल्पभुसावळ येथे येत्या काळात ४०० कोटी रुपये खर्च करून आधुनिक बोगी निर्मितीचा कारखाना उभारला जाईल तसेच ‘रेल जल’ हा शुद्ध बाटलीबंद पाणी निर्मितीचा कारखानाही होणार आहे.मॉडेल स्टेशनवर वायफाय सुविधा सुरूजळगाव-भुसावळ दरम्यान तिसरी लाईन पूर्ण, चौथ्या लाईनचे काम भूसंपादनाच्या अडचणीमुळे स्वत:च्या जागेतच काम करणारभविष्यात मनमाड व त्यानंतर इगतपुरी तसेच दौडपर्यंत तिहेरी लाईन झाल्यावर गाड्यांची संख्या वाढणारचाळीसगाव- धुळे मार्गावर इलेक्ट्रीक इंजिनचा वापर सुरू झाल्याने व ट्रॅकच्या सुधारणेने वेग मर्यादा ताशी ६० वरून १०० कि.मी. केली जाणारनवीन शिवाजी नगर उड्डाणपुलाच्या कामासाठी १५ आॅक्टोपरपासून जुना पूल पाडण्यास प्रारंभ होणारभुसावळ विभागात सरकते जिने, लिफ्ट, रेस्टॉरंट, फलाटांची लांबी वाढविणे, छत उभारणे अशी कामे सुरु आहेत.सामाजिक संस्थांच्या पुढाकारातून जळगाव रेल्वे स्टेशनचे सुुशोभिकरण प्रस्तावित

टॅग्स :railwayरेल्वेJalgaonजळगाव