तोरनाळे, ता.जामनेर : तोरनाळे घाटीच्या वनविभागात अक्षय सुभाष खडके (२२, रा.शिंदखेडा, ता.मोताळा, जि.बुलढाणा) या महाविद्यालयीन तरुणाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला.शुक्रवार १२ रोजी तोरनाळे गावातील काही गुराखी गुरे चारण्यासाठी गेले असता त्यांना हा मृतदेह दिसला. त्यांनी याबाबत पोलीस पाटील गणेश पाटील यांना माहिती दिली. त्यानुसार फत्तेपूर दूरक्षेत्रचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.अक्षय हा तृतीय वर्ष विज्ञान शाखेत शिक्षण घेत होता. आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. तो १ आॅक्टोबरपासून घरातून बेपत्ता होता. या प्रकरणी धामणगाव बढे पोलीस स्टेशनला मिसींगची तक्रार देण्यात आली होती. त्याच्या खिशातील चिठ्ठीच्या आधारे ओळख पटली. मृतदेह पूर्णपणे कुजल्यामुळे घटनास्थळी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. यावेळी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.
तोरनाळे वनविभागात आढळला महाविद्यालयीन तरुणाचा मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 21:51 IST
तोरनाळे घाटीच्या वनविभागात अक्षय सुभाष खडके (२२, रा.शिंदखेडा, ता.मोताळा, जि.बुलढाणा) या महाविद्यालयीन तरुणाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला.
तोरनाळे वनविभागात आढळला महाविद्यालयीन तरुणाचा मृतदेह
ठळक मुद्देमयत विद्यार्थी हा तृतीय वर्ष विज्ञान शाखेचा१ आॅक्टोबरपासून होता घरातून बेपत्तामृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने जागेवरच केले शवविच्छेदन