शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात पुरात वाहून गेलेल्या तरुणाचा पाचव्या दिवशी सापडला मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 12:35 IST

असोदा शिवारात आढळला मृतदेह

ठळक मुद्देशववाहिका न मिळाल्याने हालमृतदेह आणण्यासाठी मदत मिळेना

जळगाव : संततधार पावसामुळे लवकी नाल्याला आलेल्या पुरात वाहून गेलेल्या हेमंत अरुण वाणी (वय ३५, रा.श्री लक्ष्मी नारायण नगर) या तरुणाचा मृतदेह सोमवारी सकाळी आठ वाजता असोदा शिवारात नाल्याच्या काठावर आढळून आला. गुरुवार,१६ रोजी दुपारी ३.४५ वाजता अयोध्या नगरातील लक्ष्मी नारायण नगरातील नाल्यात तोल जावून पडल्याने हेमंत वाहून गेला होता.दरम्यान, चार दिवस मनपाच्या आपात्कलीन विभागाने शोध घेतल्यानंतर देखील हेमंत चा मृतदेह हाती न लागल्याने रविवारी शोध मोहीम थांबविण्याचा निर्णय घेतला होता. अखेरीस सोमवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास हेमंतचा मृतदेह असोदा शिवारात आढळून आला.मदतीला धावून जाणारा म्हणून ओळखहेमंत हा गरजुंच्या मदतीला धावून जात असे. कोणाशीही त्याचे वैर नव्हते. अजातशत्रू अशी त्याची ओळख होती. हेमंत ज्या पुलावरुन नाल्यात पडला, त्याच पुलावर या घटनेच्या आधी गाय पडली होती, तेव्हा हेमंत यानेच या गायीला पाण्यातून काढून जीवनदान दिले. तसेच अनेक लहान मुलांना त्याने नाल्याच्या काठावरुन दुसऱ्या दिशेला सुखरुप हलविले होते.मृतदेह आणण्यासाठी मदत मिळेना...सकाळी आठ वाजता मृतदेह आढळून आल्यानंतर नातेवाईकांनी रुग्णवाहिका व शववाहिका चालकांच्या विनवण्या केल्या, मात्र मृतदेह कुजलेला असल्याने अनेक रुग्ण व शववाहिका चालकांनी असोदा येथे येण्यास नकार दिला. शेवटी आमदार सुरेश भोळे यांच्या एका कार्यकर्त्याने विनंती करुन रुग्णवाहिका चालकास येण्यास राजी केले.त्यानंतर साडे बारा वाजता मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. आपत्कालिन स्थितीत रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची अडवणूक करुन वारेमाप पैसे घेणाºया रुग्णवाहिका व शववाहिका चालकांच्या माणुसकी शून्य कारभाराने अनेकांनी नाराजी व्यक्त केली.

टॅग्स :Crimeगुन्हाJalgaonजळगाव