चाळीसगाव, जि.जळगाव : तालुक्यातील बोढरे गावातील एका बेपत्ता बालकाचा खून झाल्याचा प्रकार शुक्रवारी दुपारी उघडकीस आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे. बालकाचा मृतदेह एका विहिरी लगत असलेल्या खड्ड्यात गोणपाटात टाकून फेकण्यात आला होता.बोढरे येथील ऋषिकेश पंडित सोनवणे (वय १० वर्षे) हा शुक्रवारी २९ जून रोजी सायंकाळी ७.३० वाजेपासून गावातून बेपत्ता झालेला होता. सर्वत्र शोध घेऊनदेखील ऋषिकेश कुठेही आढळून आला नाही. यामुळे यासंदर्भात हरवल्याची नोंद चाळीसगाव पोलिसात करण्यात आली होती.दरम्यान,५ रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास बोढरे गाव शिवारातीलाच पेट्रोल पंपासमोरील एका विहिरीलगत असलेल्या खड्ड््यात एका गोणपाटातून दुर्गंधी येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार घटनास्थळी जाऊन बघितले असता, गोणपाटावर मोठे दगड ठेवलेले होते. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. पोते उघडून बघितले असता, कुजलेल्या अवस्थेत बालकाचा मृतदेह असल्याचे निदर्शनास आले.थोड्याच वेळात त्या बालकाची ओळख ऋषिकेश सोनवणे अशी पटली. या घटनेमुळे तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली असून, घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक उत्तम कडलग, पो.नि. प्रतापराव शिकारे, विजयकुमार ठाकूरवाड, पीएसआय सुधीर पाटील, पांढरकर, एसआय काळे व कर्मचारी उपस्थित होते.
बोढरे गावातील बेपत्ता बालकाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2019 17:56 IST
चाळीसगाव तालुक्यातील बोढरे गावातील एका बेपत्ता बालकाचा खून झाल्याचा प्रकार शुक्रवारी दुपारी उघडकीस आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे.
बोढरे गावातील बेपत्ता बालकाचा खून
ठळक मुद्देमृतदेह आढळला पोत्यात घटनेमुळे तालुक्यात प्रचंड खळबळ