शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

अखंड भारत स्मृतीदिनानिमित्त १८२ जणांचे रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 19:53 IST

अंबिका व्यायाम शाळेतर्फे अखंड भारत स्मृतीदिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात १७३ पुरूष व ९ महिला अशा १८२ दात्यांनी रक्तदान करून कोरोनाच्या महामारीतही आपली ज्वाज्वल राष्ट्रभक्ती समर्पित केली.

ठळक मुद्देकोरोनाच्या महामारीतही राष्ट्रभक्ती उदंड जाहली लताबाई विश्वनाथ महाजन या महिलेचे सतत १५ वेळा रक्तदान

रावेर, जि.जळगाव : शहरातील अंबिका व्यायाम शाळेतर्फे अखंड भारत स्मृतीदिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात १७३ पुरूष व ९ महिला अशा १८२ दात्यांनी रक्तदान करून कोरोनाच्या महामारीतही आपली ज्वाज्वल राष्ट्रभक्ती समर्पित केली. या शिबिराला १५ वर्षांची परंपरा लाभली असून सोळाव्या वर्षात यंदा पदार्पण केले आहे.शहरातील अंबिका व्यायामशाळेच्या प्रांगणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संघटक लखमसी पटेल, कांतीलाल महाराज, भाजप जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन व बालरोगतज्ज्ञ डॉ.प्रवीण चौधरी यांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करून उद्घाटन करण्यात आले.डॉ.माधवराव गोळवलकर रक्तपेढीच्या संयुक्त विद्यमाने हे रक्तदान शिबिर झाले. पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे, जि.प.चे माजी सभापती सुरेश धनके, नगराध्यक्ष दारा मोहंमद, माजी नगरसेवक अनिल अग्रवाल, देवीचंद छोरिया, भाजप तालुकाध्यक्ष राजन लासूरकर, काँग्रेस तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन आदी अतिथींनी शिबिराला भेट दिली. याप्रसंगी अंबिका व्यायामशाळेचे संचालक भास्कर महाजन (पहेलवान) व सहकाऱ्यांनी स्वागत केले.कर्जोद ग्रा.पं.सदस्या भाग्यश्री पाठक यांनी त्यांचा वाढदिवस व अखंड भारत स्मृतीदिनाचे औचित्य साधून रक्तदान करण्याचा संकल्प सोडला. लताबाई विश्वनाथ महाजन या महिलेने सतत १५ वेळा रक्तदान करून आपली राष्ट्रभक्तीचे समर्पण केले आहे.या रक्तदान शिबीराचे यशस्वीतेसाठी अंबिका व्यायाम शाळेचे अध्यक्ष भास्कर पहेलवान, रवींद्र महाजन, विकास देशमुख, चंद्रकांत रायपूरकर, भगवान चौधरी, संतोष पाटील, अशोक पाटील, अनिल पाटील, नत्थू महाजन, युवराज माळी, अजय महाजन, सचिन महाजन, अ‍ॅड तुषार महाजन, निलेश पाटील आदींनी परिश्रम घेतले. 

टॅग्स :Blood Bankरक्तपेढीRaverरावेर