शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

काळा सोमवार : सहा अपघात; पाच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 22:29 IST

तीन ठिकाणी डंपरची धडक : विद्यार्थ्याला कारने उडविले

जळगाव : सोमवारी जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी सहा अपघात झाले. त्यात एका विद्यार्थ्यासह पाच जण ठार झाले. तर माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांच्या पत्नी डॉ.वर्षा पाटील या बालंबाल बचावल्या. शहरानजीक असलेल्या कुसुंबा गावाजवळ रिक्षातून उतरुन घरी जाण्याच्या तयारीत असतानाच मागून भरधाव वेगाने आलेल्या वाळूच्या डंपरने ईश्वर रतन मिस्तरी (३५, रा.कुसुंबा, ता.जळगाव) या तरुणाला चिरडल्याने तो जागीच गतप्राण झाला. सकाळी साडे अकरा वाजता हा अपघात झाला.दुसऱ्या घटनेत वडिलांची औषधी घेण्यासाठी जळगाव शहरात येत असताना रस्त्याने थांबून तोंडाला रुमाल बांधण्याची तयारी करताना मागून भरधाव वेगाने आलेल्या कारने उडविल्याने महेश दिलीप म्हाळके (२२, रा.गोरगावले, ता.चोपडा) या तरुणाची जागीच मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी सकाळी साडे आठ वाजता चोपडा-विदगाव मार्गावरील देवगावजवळील चेरी फॅक्टरीजवळ झाला.नशिराबादजवळ महामार्गावर डॉ.वर्षा पाटील यांच्या कारला डंपरने धडक दिली. त्यात चालकासह त्या बालंबाल बचावल्या. सकाळी साडे नऊ वाजता हा अपघात झाला. कुºहे पानाचे येथे शेतात कामाला जात असतांना प्रल्हाद तुळशिराम पाटील (६५,) यांना भरधाव डंपरने जोरदार धडक दिली.त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी साडे सात वाजता कुºहे पानाचे येथे घडली.हिंगोणा, ता.यावल गावाजवळ दोन दुचाकींच्या समोरासमोर धडकेत दोन तरुण जागीच ठार झाल्याची घटना घडली. अलाउद्दीन मुबारक तडवी (३५, रा. तडवीवाडा, यावल) व पंखा बाबू पवार(४०, रा.हलखेडा ता. मुक्ताईनगर) या दोघांचा जागीच मृत्यू झाला तर नवाब मुबारक तडवी (रा.फैजपुर) व रितेश धारसिंग पवार (रा. हलखेड ता मुक्ताईनगर) हे गंभीर जखमी झाले असून त्यांना यावल येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव