शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

महापौरांचा राजीनामा नसल्याने भाजपात वाढली नाराजी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 21:48 IST

जळगाव : मनपा महापौर, उपमहापौरांना निश्चित केलेला १० महिन्यांचा कार्यकाळ व चार महिन्यांची मुदतवाढ केलेला कार्यकाळ पूर्ण होवूनही महापौर ...

जळगाव : मनपा महापौर, उपमहापौरांना निश्चित केलेला १० महिन्यांचा कार्यकाळ व चार महिन्यांची मुदतवाढ केलेला कार्यकाळ पूर्ण होवूनही महापौर सीमा भोळे व उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे यांनी राजीनामा दिलेला नाही. त्यामुळे भाजपा नगरसेवकांमध्ये नाराजी वाढली असून, काही नाराज नगरसेवकांच्या गटाने मनपात गुप्त बैठक घेतल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.दरम्यान, २० नोव्हेंबर रोजी ही बैठक झाली असून, या बैठकीत भाजपाचे ८ ते ९ नगरसेवक उपस्थित होेते. २०१८ मध्ये मनपात भाजपाची सत्ता आल्यानंतर सीमा भोळे यांना महापौर व तर डॉ.अश्विन सोनवणे यांना उपमहापौरपद देण्यात आले होते. हे पद १० महिन्यांसाठी देण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले होते. जुलै २०१९ मध्ये ही मुदत संपली मात्र विधानसभा निवडणुकांमुळे महापौर, उपमहापौरांना मुदतवाढ देण्यात आली होती. ती मुदतही संपली असतानाही महापौर, उपमहापौरांनी राजीनामा न दिल्याने भाजप नगरसेवकांमध्ये नाराजीचा सुर वाढत आहे. याच नाराज गटाची बैठक महापालिकेत झाली.याबाबत वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज होती. राज्यातील सत्तेच्या पेचामुळे गिरीश महाजन हे व्यस्त आहेत.मात्र, महापौर, उपमहापौरांनी मुदत संपल्यामुळे राजीनामा द्यायला हवा होता. आमदार सुरेश भोळे देखील याबाबत गंभीर नसून, त्यांनी वरिष्ठ नेत्यांचा अनुपस्थितीत याबाबत निर्णय घेवून, महापौरांचा राजीनामा घ्यायला हवा अशा भावना या बैठकीत नगरसेवकांनी व्यक्त केल्या.मनपाच्या ‘त्या’जागेच्या विषयावरून आमदार नाराज1 स्थायी समितीच्या सभेत स्थायी समिती सभापती अ‍ॅड.शुचिता हाडा यांनी रिंगरोडवरील मनपाने आपल्या मालकीच्या जागेवर महिला मंडळाला दिलेली जागा जिल्हा बॅँकेला भाडे तत्वावर दिली असल्याने ही जागा मनपाने ताब्यात घेण्याच्या सूचना अ‍ॅड.हाडा यांनी दिल्या होत्या.2 त्यावरून आमदार सुरेश भोळे यांनी नगरसेविका दीपमाला काळे यांचे पती मनोज काळे यांच्याकडे अ‍ॅड.हाडा यांच्या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त करत, या निर्णयामुळे भांडण लावण्याचे काम केले जात असल्याचे आमदार भोळे यांनी म्हटल्याची माहिंती भाजपच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली.3 जिल्हा बॅँकेत सुरेश भोळे हे संचालक आहेत. जिल्हा बॅँकेच्या शाखेला दिलेली जागा मनपा ताब्यात घेत असल्याने जिल्हा बॅँकेच्या अध्यक्षा अ‍ॅड.रोहिणी खडसे यांच्याकडे चुकीचा संदेश जाईल अशी भिती आमदार भोळे यांनी व्यक्त केल्याचीही माहिती सूत्रांनी दिली.4 याबाबत अ‍ॅड.हाडा यांनी जिल्हा बॅँकेच्या अध्यक्षा अ‍ॅड.रोहिणी खडसे यांच्याशी चर्चा करून या जागेचा व्यावसायिक वापर महिला मंडळाकडून होत असून, याबाबत मनपाने २००६ मध्ये ८१ ब ची नोटीस बजाविली असल्याची माहिती दिली. त्यावर खडसे यांनी अ‍ॅड.हाडा यांचा निर्णय योग्य असल्याचे सांगितले. मात्र, यावरून भाजपा आमदार व काही नगरसेवकांमध्ये सर्व काही आलबेल दिसून येत नाही.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाJalgaonजळगाव