शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळ तालुक्यात भाजपाचे वर्चस्व मात्र गटबाजीला आवर आवश्यक...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2019 14:02 IST

तालुका वार्तापत्र भुसावळ

भुसावळ तालुक्यात १९९५ पर्यंत काँग्रेसचे वर्चस्व होते. त्यानंतर शिवसेना, २००१ पासून राष्ट्रवादी तर २०१४ पासून भाजपाचे वर्चस्व दिसून येत आहे. मात्र अद्यापही भाजपाला आव्हान देण्याची ताकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असल्याचे दिसून येत आहे.दरम्यान, भाजपाचे वर्चस्व दिसून येत असले तरी शहरात माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल चौधरी व वरणगाव येथील नगराध्यक्ष सुनील काळे व स्थानिक पदाधिकारी यांच्यामधील गटबाजीही दुर्लक्षित करून चालणार नाही. त्यात शिवसेना लोकसभा निवडणुकीमध्ये कोणती भूमिका घेते यावरही राजकीय समीकरण अवलंबून आहे.तालुक्यात १९९५ पर्यंत काँग्रेसचे (पर्यायाने भाजपाचे विद्यमान नगराध्यक्ष रमण भोळे यांचे वडील माजी आमदार स्व.देवीदास भोळे यांचे) वर्चस्व होते. १९९५ साली शिवसेनेने हा मतदारसंघ काबीज केला. तेव्हापासून काँग्रेस तालुक्यातून हद्दपार झाल्याचे दिसून येत आहे. आताची परिस्थिती पाहता काँग्रेसचा तालुक्यात एकही नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, सरपंच नाही. किंवा कोणत्याही संस्था काँग्रेसच्या ताब्यात नाहीत. त्याचप्रमाणे काँग्रेसच्या शाखाही कुठेच दिसून येत नाही, अशी बिकट अवस्था कॉंग्रेसची झाली आहे.माजी आमदार संतोष चौधरी यांनी शिवसेना सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादीची ताकद वाढली. शिवसेनेला २००४ पासून विधानसभेतून बाहेर काढले. २००९ नंतर शिवसेनेची अवस्था अतिशय हलाखीची केली. २०१४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार संजय ब्राह्मणे हे अनामत रक्कमही वाचू शकले नाही. त्यानंतरही झालेल्या नगरपालिका निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदार अ‍ॅड.श्याम गोंदेकर यांच्यासह शिवसेनेचे तत्कालीन शहर प्रमुख तथा विद्यमान नगरसेवक मुकेश गुंजाळ वगळता बहुतांश उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. शिवसेनेची त्यानंतरही ताकद फारशी वाढल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे भाजपाला केवळ राष्ट्रवादी काँग्रेसच आव्हान देवू शकते, असे चित्र आहे. भाजपाची तालुक्यात शिवसेनेचा सहकारी मित्र पक्ष म्हणून ओळख होती. २०१४ साली तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे पालकमंत्री संजय सावकारे यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर त्यांच्या रूपाने भाजपाला आमदार मिळाला. तर त्यानंतर झालेल्या नगरपालिका निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष भाजपाचाच निवडून आला.दोन ठिकाणी भाजपाने सत्ता काबीज केली असली तरी माजी आमदार चौधरी यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती व शेतकी संघावर वर्चस्व मिळवून सहकार क्षेत्रावर त्यांचे वर्चस्व असल्याचे दाखवून दिले. तालुक्यात भुसावळ व वरणगाव अशा दोन नगरपालिका आहे. दोन्ही नगरपालिकांवर भाजपाची सत्ता आहे. मात्र भुसावळ न.पा.वर माजी मंत्री खडसे तर वरणगाव न.पा.वर जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली सत्ता आहे. वरणगाव नगरपालिकेत तर भाजपात सरळसरळ दोन गट आहे. भुसावळ न.पा.मध्ये भाजपाचे २८ नगरसेवक आहेत. माजी आमदार चौधरी यांच्या ‘जनाधार’चे १९ नगरसेवक आहेत.

टॅग्स :Politicsराजकारण