शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

भाजपातील दुही ‘चलो गाव की ओर’...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 13:18 IST

ग्रामीण क्षेत्र हेच खरे राजकारणाचा कणा

चंद्रशेखर जोशीग्रामीण क्षेत्रातील वडाचे पार हे राजकारणाचे अड्डे असतात. गावात कोणाच्या घरात काय झाले यापासून तर मोदींनी काय निर्णय घेतला... याबाबतच्या गप्पा या पारावर होत असतात. विशेष म्हणजे ही गप्पा मारणारी मंडळी एकाच पक्षाचा विचार घेऊन चालणारी असते काय तर त्याचे उत्तर नाही असेच मिळेल. याचे कारण बहुतांश मंडळी एखाद्या पक्षाचा विचार किंवा निर्णय आवडला की त्या बाजुने बोलायला सुरूवात करते, आणि हळू हळू तो विचार पारावरच्या गप्पांवरून घरातील ओसरीपर्यंत पोहोचतो. घरातील बायाबापड्यांपर्यंत ती चर्चा पोहोचते. तरूण मुलांच्या गप्पांमध्येही या पक्षाने हा निर्णय घेतला तो चांगला होता...इथपर्यंत बोलणे सुरू असते. त्यामुळेच ग्रामीण क्षेत्र हेच खरे राजकारणाचा कणा असल्याचे बोलले जाते. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद गटाबाबतचे निर्णय याच पारावर ठरतात. त्यामुळेच राजकीय पक्षाचा ओढा हा ग्रामीण भागाकडे सर्वाधिक असतो. विशेष म्हणजे मतदानाचे प्रमाणही ग्रामीण भागातून जास्त निघते त्यामुळे पुढारी मंडळी ग्रामीण भागातील लोकांना जास्त जपतात. आपल्या राजकारणावर ग्रामीण भागाचा नेमका काय परिणाम होतोय.. याचा विचार राजकीय पक्ष अगत्याने करत असतात. ग्रामीण भागातील लोकभावना नेमकी काय? हे लक्षात घेऊन भाजपाने पक्षाचा विस्तार केला व गेल्या काही वर्षातील निवडणुकांमध्ये या पक्षाला सातत्याने यश येत आहेत. मग ते अगती ग्रामपंचायतीपासून तर लोकसभा, विधानसभा व सहकार संस्था, पालिका, महापालिका, नगरपंचायती ते जिल्हा परिषद, पंचायत समित्यांपर्यंत या पक्षाने यश मिळविले आहे. मात्र गत काळाचे अवलोकन करता विविध ठिकाणी सत्तेत असताना या पक्षाला ही सत्ता पचविता येत नसल्याचेच लक्षात येत आहे. जिल्हा परिषदेच्या बैठकीतील वादावरून यावर शिक्कामोर्तब झाले आहे. १२० कोटींचा विकास निधी मिळतो. तो वाटपावरून विरोधकांनी ओरड करणे ठिक आहे पण सत्ताधारीच जर गोंधळ घालत असतील तर... ते दुर्दैवच म्हणावे लागेल. सत्ताधाऱ्यांची एक परंपरा पूर्वी होती आणि आजही आहे, ती म्हणजे सत्ताधारी विकास निधी अगोदर आपापल्या मतदार संघांमध्ये वाटून उरलेला किरकोळ निधी विरोधकांना देतात. मात्र पक्षातील जिल्ह्याचे राजकारण जिल्हा परिषदेत आले आणि त्यातून निधी वाटपाचा प्रश्न निर्माण झाला. सत्ताधाºयांच्या बंडामुळे जिल्हा परिषदेत विरोधक प्रबळ झाल्याची स्थिती आहे. भविष्यात याचे पडसादही उमटू शकतात. पक्षातील दुहीमुळे ‘चलो गाव की ओर’ हा नारा उलटा होत आहे की काय? अशी परिस्थिती या पक्षात दिसून येत आहे.

टॅग्स :BJPभाजपाJalgaonजळगाव