शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाच्या वचननाम्यात ‘गटबाजी’चे प्रमाणपत्र!

By admin | Updated: February 9, 2017 00:44 IST

संहितेची ‘शिस्त’मोड : उन्मेष पाटील ‘गायब’, स्मिता वाघ पहिल्या तर जि.प.अध्यक्ष शेवटच्यास्थानी

जळगाव : चाळीसगाव तालुक्यातील भाजपाच्या ज्येष्ठ पदाधिका:यांनी आमदार उन्मेष पाटील यांच्याविरोधात राग आवळल्यानंतर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी भाजपाच्या वचननाम्याच्या मुखपृष्ठावरून त्यांचा फोटो  गायब झाला आहे. ही सहज झालेली चुक आहे की जाणिवपूर्वक केलेली खेळी आहे, अशी चर्चा दिवसभर सुरु होती.   बुधवारी सकाळी  भाजपा कार्यालयात ‘वचननामा’चे प्रकाशन पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते झाले. अनवधानाने की जाणिवपूर्वक?वचननाम्याच्या मुखपृष्ठावर जिल्ह्यातील आमदार व खासदारांना स्थान आहे. आमदार उन्मेष पाटील यांचा फोटो मात्र नाही. हा प्रकार अनवधानाने की जाणिवपूर्वक केलेली खेळी आहे, याविषयी दिवसभर चर्चा सुरु होती. गत आठवडय़ात उन्मेष पाटील यांच्या विरोधात चाळीसगावातील भाजपाच्या जुन्या कार्यकत्र्यानी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. तसेच जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्या राजीनाम्याचीही मागणी झाली होती. खासदारांआधी स्मिता वाघ यांना स्थानभाजपाच्या वचननाम्याच्या मुखपृष्ठावर दुस:या रांगेत विधान परिषदेच्या सदस्या स्मिता वाघ यांचे छायाचित्र आहे. त्यानंतर खासदार ए.टी.पाटील व रक्षा खडसे यांचा फोटो आहे. त्या पाठोपाठ अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष मोहम्मद हुसेन खान,  आमदार सुरेश भोळे, आमदार हरिभाऊ जावळे, आमदार संजय सावकारे, विधान परिषदेचे सदस्य आमदार चंदूलाल पटेल यांचे छायाचित्र आहेत. राज्यमंत्र्याचा दर्जा असलेल्या जि.प.अध्यक्ष प्रयाग कोळी यांचे तिस:या रांगेत शेवटच्या क्रमांकावर छायाचित्र आहे. माजी केंद्रीय मंत्री एम.के. अण्णा पाटील यांचेही छायाचित्र वचननाम्यावर नाही. तांत्रिक चुकीमुळे पाटील यांचा फोटो राहिला. चूक लक्षात आल्यानंतर लगेचच ती दुरुस्त करण्यात आली.    -उदय वाघ, जिल्हाध्यक्ष, भाजपा.