शहरं
Join us  
Trending Stories
1
अखेर एअर इंडियाचा संप मिटला, हकालपट्टी झालेल्या २५ कर्मचाऱ्यांनाही परत कामावर घेतले
2
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
3
एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांचा संप मागे; हकालपट्टी झालेल्या कर्मचाऱ्यांना परत कामावर घेणार...
4
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
5
'...तर हिंदूंसाठी एकही देश शिल्लक राहणार नाही'; मुस्लीम लोकसंख्या वाढीवरून भाजपचा काँग्रेसवर निशाणा
6
फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, 8 ठार, 3 गंभीर; शिवकाशीत भीषण दुर्घटना
7
प्रज्वल रेवण्णाविरोधात ७०० महिलांनी तक्रार केलीय का? NCW ने सांगितलं यामागील सत्य...
8
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
9
Who is Vidwath Kaverappa? १७व्या वर्षापर्यंत हॉकी खेळला अन् मग क्रिकेटकडे वळला... त्याने फॅफ, विल जॅक्सला पाठवले मागे
10
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
11
"आम्हाला रस्त्यावर आणून तू विदेशात स्थायिक", पालकांची ४ पानी सुसाईड नोट, डोळ्यात येईल पाणी
12
संजू सॅमसनला बाद ठरवणाऱ्या Controversial  निर्णयाचा नवा Video, अखेर सत्य समोर आलेच... 
13
'सिकंदर' ची घोषणा झाल्यानंतर सलमान-रश्मिकाचा जुना व्हिडिओ व्हायरल, भाईजानचं तेलुगू ऐका!
14
श्रीलंकेने वर्ल्ड कप स्पर्धेसाठी वनिंदू हसरंगाच्या नेतृत्त्वाखाली तगडा संघ उतरवला; CSK, MI ला दिला धक्का 
15
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 
16
'12th Fail' फेम विक्रांत मेसीने टॅक्सी ड्रायव्हरला केली शिवीगाळ? अभिनेत्यावर गंभीर आरोप, व्हिडिओ व्हायरल
17
मोठी बातमी : एक चूक काय झाली, LSG च्या मालकांनी लोकेश राहुलच्या हकालपट्टीची तयारी सुरू केली
18
"निवडणूक प्रचार हा मूलभूत अधिकार नाही", केजरीवाल यांच्या जामीन अर्जाला ईडीचा विरोध
19
विराट कोहलीला पंजाबविरूद्धच्या सामन्यात मोठ्या विक्रमाची संधी; ठरू शकतो पहिलाच भारतीय!
20
मुग्धा गोडसे भडकली, मॉलमधील एका कॅफेत आईला मिळाली वाईट वागणूक; प्रकरण काय?

बालेकिल्ल्यातच भाजपापुढे उमेदवारीचा पेच...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 11:01 AM

हाती उरले मोजकेच दिवस

ठळक मुद्दे प्रचारासाठी होणार कसरत

जळगाव: लोकसभा निवडणुकीसाठी जळगाव मतदार संघातून उमेदवारी दाखल करण्यासाठी अद्यापही भाजपाकडून चर्चेच्या फेऱ्याच सुरू असल्याने बालेकिल्ल्यातच या पक्षापुढे मोठा पेच उभा राहिला असल्याची परिस्थिती दिसून येत आहे.लोकसभा निवडणूक १० फेब्रुवारी रोजी जाहीर झाली. निवडणुकीपूर्वी युती विरूद्ध आघाडी अशी लढतही ठरली.रावेर लोकसभा मतदार संघात भाजपाकडून विद्यमान खासदार रक्षा खडसे यांचे नाव जवळपास निश्चित असल्याचे पक्षातील पदाधिकारी सांगतात. या मतदार संघातून विरोधी गटातून आघाडीतर्फे राष्टÑवादीकडील ही जागा कॉँग्रेसकडे येणार असेही सांगितले जात आहे. तसे झाल्यास माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांची उमेदवारी निश्चित होऊ शकते.मात्र या संदर्भातील आघाडीची घोषणा अद्याप बाकी आहे.या दोन दिवसात त्यावर निर्णय होऊ शकतो असे सांगितले जात आहे.उमेदवाराची होणार कसरतजळगाव लोकसभा मतदार संघात सहा विधानसभा मतदार संघ आहेत. यात जळगाव शहर, जळगाव ग्रामीण, पाचोरा, अमळनेर, एरंडोल-पारोळा व चाळीसगाव असे मतदार संघ आहेत. उमेदवारीत बदलाची शक्यता लक्षात घेता नव्या उमेदवारास नागरिकांपर्यंत जाण्यास वेळ लागू शकतो. त्यामुळे प्रचारात मोठ्या अडचणी निर्माण होण्याचीच शक्यता वर्तवली जात आहे. दुसरीकडे विरोधी पक्षाचा प्रचार गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू झाला आहे. त्यामुळे सद्य स्थितीत या मतदार संघात उमेदवारीचा पेच निर्माण झाल्याचीच चिन्हे भाजपापुढे आहे.‘क्लीप’ ठरतेय डोकेदुखी... पक्षात उमेदवारीबाबत पेच निर्माण झाल्याची वेगवेगळी कारणे राजकीय क्षेत्रात चर्चेत आहेत. उमेदवारी देतांना अतिशय सावध पवित्रा पक्षाकडून घेतला जात आहे. याचे पक्षांतर्गत विरोधकांनी काहींच्या केलेल्या गत काळातील ‘व्हीडीओ क्लीप’ हेही एक कारण असल्याचे सांगितले जात आहे.जळगाव लोकसभा मतदार संघ४जळगाव लोकसभा मतदार संघ हा भाजपाचा बालेकिल्ला आहे. अगदी पक्षाचे नेते उत्तमराव पाटील यांच्या काळापासून या मतदार संघात जवळपास भाजपानेच यश मिळविले आहे. मात्र यावेळी उमेदवारी जाहीर करण्याचा पेच या मतदार संघात दिसून येत आहे. या संदर्भात अद्याप केवळ दावे प्रतिदावे सुरू आहेत. आमदार स्मिता वाघ, पारोळा पालिकेचे नगराध्यक्ष करण पवार, तांत्रिक सल्लागार असलेले प्रकाश पाटील या तिघांची नावे आघाडीवर आहेत. पक्षातील बडी मंडळी प्रकाश पाटील यांच्यासाठी जिद्दीने कामाला लागली आहेत. मात्र ज्येष्ठता व पक्ष कार्याच्या जोरावर स्मिता वाघ व राजकीय पार्श्वभूमीच्या जोरावर करण पवार उमेदवारीसाठी दावेदारी करीत आहेत. तर ‘क्लिप’मध्ये अडकलेले व इतर स्पर्धेतून बाहेर गेले आहेत.

टॅग्स :Politicsराजकारण