शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

खडसेंच्या होमपीचवर भाजपची पक्षबांधणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2020 11:15 PM

भोळे नाव न घेता म्हणाले खडसेंना गद्दार

लोकमत न्यूज नेटवर्कमुक्ताईंनगर :  माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशानंतर  मुक्ताईनगरमध्ये खासदार रक्षा खडसे यांच्या कार्यालयात  प्रथमच भाजपची पक्षबांधणीसाठी  बैठक गुरुवारी सायंकाळी पार पडली. याचप्रमाणे भुसावळ व यावल येथेही ही बैठक झाली.मुक्ताईनगर येथे बैठकीत भाजपचे प्रदेश संघटन सरचिटणीस विजय पुराणिक, संघटन मंत्री रवींद्र अनासपुरे, खासदार रक्षा खडसे, आमदार तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष  सुरेश भोळे, बेटीबाचाओचे राष्ट्रीय संयोजक डॉ. राजेंद्र फडके, माजी जिल्हाध्यक्ष अशोक कांडेलकर, किशोर काळकर, माजी जि. प.  उपाध्यक्ष नंदू महाजन यांची व्यसपीठावर उपस्थित होती. मात्र, भाजपचे आमदार तथा नेते गिरीश महाजन येथे व भुसावळ, यावल येथेही अनुपस्थीत होते. खडसे यांनी राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केला मात्र त्यांच्या स्नुषा खासदार रक्षा खडसे या भाजपतच  आहे. स्वतः खडसे यांनी राष्ट्रवादी पक्ष प्रवेश प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस भाजपपेक्षा दुपटीने वाढविणार असल्याचे घोषित केले होते. भाजपला जोरदार डॅमेज होण्याची शक्यता गृहीत धरून भाजपने कंबर कसली आहे. पक्षबांधणीसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. पक्ष संघटन मजबुतीच्या दृष्टीने वरिष्ठ नेत्यांकडून या बैठकीत चाचपणी करण्यात आली.जिल्हा भाजपच्या कोअर कमिटीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीनंतर, गुरुवारी सांयकाळी ५ वाजता भाजपने  थेट एकनाथ खडसे यांच्या मुक्ताईनगर येथे पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्याची बैठक घेतली. सदर बैठकीसाठी सचिन पानपाटील, अनंतराव कुलकर्णी, मुक्ताईनगर नगरपंचायत गटनेता पियुष महाजन, उपगटनेता बबलू कोळी नगरसेवक मुकेश वानखडे नगरसेवक ललित महाजन पंचायत समिती सदस्य राजेंद्र सावळे विनोद पाटील, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष अंकुश चौधरी, युवा मोर्चा विधानसभा क्षेत्र प्रमुख दत्ता पाटील, बोदवड तालुका सरचिटणीस भगतसिंग पाटील, माजी सरचिटणीस कैलास वंजारी, नगरसेवक अनिल खंडेलवाल  आदी उपस्थित होते. तर यावल  येथील धनश्री चित्रमंदिरात   बैठक झाली.  विजय पुराणिक, सरेश भोळे, रक्षा खडसे, राजेंद्र फडके, किशोर काळकर आदींची मुख्य उपस्थिती होती.  माजी जि. प. सदस्य हर्षल पाटील, पं. स. सभापती पल्लवी चौधरी, जि. प. अध्यक्षा रंजना पाटील, शिक्षण सभापती रविंद्र पाटील, जि. प. सदस्या सविता भालेराव, सुरेश पाटील, मसाका चेअरमन शरद महाजन, नगरसेवक डॉ. कुंदन फेगडे, हिरालाल चौधरी, विलसा चौधरी, ताुलकाध्यक्ष उमेश फेगडे, शहर अध्यक्ष डॉ. निलेश गडे यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते  उपस्थीत    होते. भुसावळ  नगराध्यक्षांची गैरहजेरीभुसावळ  येथे लोणारी मंगल कार्यालयात बैठक झाली. सुरेश भोळे आमदार संजय सावकारे व इतर मुख्य पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. मात्र नगराध्यक्ष रमण भोळे, सरचिटणीस प्रा सुनील नेवे, शहराध्यक्ष दिनेश नेमाडे, वसंत पाटील, पुरुषोत्तम नारखेडे, गिरीश महाजन, बापू महाजन, नगरसेवक बोधराज चौधरी, भाजप गटनेते मुन्ना तेली पंचायत समितीच्या सभापती उपसभापती व निम्म्या सदस्यची बैठकीत गैरहजेरी होती. याबाबत जिल्हाध्यक्ष भोळे यांना विचारणा केली असता, त्यांचे राजीनामे आलेले नाहीत मात्र गैरहजर असल्याचा ते खुलासा करतील, असे भोळे यांनी स्पष्ट केले. माजी प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी, नगरसेवक पिंटू कोठारी, मनोज बियाणी, जिल्हा परिषदेच्या सदस्या पल्लवी प्रमोद सावकारे, परीक्षित बऱ्हाटे, पवन बुंदेले, डॉ. नितु पाटील, वरणगाव चे नगराध्यक्ष सुनील काळे आदी उपस्थित होते. 

सुरेश भोळे :  कोणाच्या म्हणण्यावर  नाही तर पक्षाच्या विचारावरच तो चालतो. भाजपची संघटना मजबूत आहे व ती अधिक मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकजुटीने एक दिलाने काम करावे. तर ज्या पक्षाने तुम्हाला मोठे केले आणि तोच  जर पक्ष सोडून जात असेल तर जनता अशा गद्दारांना धडा निश्चित शिकवेल. (नाव न घेता खडसेंना लगावला टोला)रक्षा खडसे : भाजपाचा विस्तार हा अधिक जोमाने करायचा आहे, मला पक्षाने सर्व कार्यकर्त्यांच्या बळावर मी दोन वेळा खासदार झाले.डॉ. राजेंद्र फडके : पक्ष संघटनेचे काम करा व  कोणते पद न मिळाल्यास नाउमेद होउ नका. कार्य करत रहा संघटना  निच्छीतच त्याची दखल घेईल. विजय पुराणिक :भाजपमध्ये लहानात लहान कार्यकर्ता हा आमदार, खासदार, मंत्री व मोठा नेता होऊ शकतो. काही घटना घडल्यास पक्ष कार्यकर्त्यांनी खचून न जाऊ नये.