शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जि.प.त भाजपसाठी धोक्याची घंटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 12:21 IST

जळगाव : राज्यात महाशिवआघाडीचे सरकार स्थापन झाल्यास जळगाव जिल्हा परिषदेतही तसेच समीकरण असेल, अशा हालचाली सुरू असताना या हालचालींना ...

जळगाव : राज्यात महाशिवआघाडीचे सरकार स्थापन झाल्यास जळगाव जिल्हा परिषदेतही तसेच समीकरण असेल, अशा हालचाली सुरू असताना या हालचालींना शनिवारच्या गदारोळाने अधिकच हवा दिली आहे़ भाजपच्या या संतप्त सदस्यांनी थेट बाहेर पडण्याचे संकेतच कालच्या गोंधळानंतर उपाध्यक्षांडे बैठकीत दिल्याने सर्वांच्या भुवया उंचावला आहेत़ १९ रोजी आरक्षण सोडत असताना हा गदारोळ भाजपसाठी धोक्याची घंटा मानला जात आहे़जिल्हा नियोजन कडून विविध हेडखाली आलेल्या निधीत डावलले गेल्याने भाजप, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या काही सदस्यांनी आपल्या हक्कासाठी स्थायी समितीच्या सभेत पदाधिकारी व अधिकाऱ्यांना धारेवर धरले़ आपण २५ सदस्य बाहेर पडू अजून आपल्या हाती महिना आहे, असे संदेश भाजपच्या काही सदस्यांनी उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन यांच्या दालनातील बैठकीत दिले़ यामुळे मंगळवारी होणारी आरक्षण सोडतीवर बरीच समीकरणे अवलंबून राहणार आहे़समान निधी मुद्दयावरून या आधीही सर्वसाधारण सभामध्ये मोठा गदारोळ झाला होता. त्यावेळीही सत्ताधाऱ्यांधील हा रोष उफाळून बाहेर आला होता़ जि़ प़ सदस्या डॉ़ नीलम पाटील यांना अधिकाºयांकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी हा प्रकार सभागृहासमोर आणला होता़ समान निधीच्या मुद्दयावरून सदस्य आक्रमक झाले होते़ अध्यक्ष व सत्ताधारी सदस्यांमध्ये शाब्दीक चकमकही झाली होती़ यावेळी विरोधात मतदानही झाले होते़ त्यानंतर स्थायीच्या सभेत वाद उफाळून आला़ ६ डिसेंबरची सभा गाजणार६ डिसेंबर रोजी जि.प.ची सर्वसाधारण सभा होत आहे. स्थायीच्या सभेतील वादंग बघता आगामी सर्वसाधारण सभा वादळी ठरण्याची शक्यता वर्तविण्यात आहे. आहे़ यावेळी सत्ता समिकरणे अधिक स्पष्ट होणार आहे़ ही सभा सत्ताधाºयांची अखेरची असेल, असा सूरही काही सदस्यांकडून व्यक्त होत आहे़पंधरा ते सोळा सदस्यांमध्ये हा निधी वाटून घेतला़ अन्य सदस्यांना अंधारात ठेवले़ समान निधी वाटपाचे सभेत ठरले असताना त्यांच्याच पक्षासह विरोधी पक्षातील काही सदस्यांना निधीपासून वंचित ठेवणे योग्य नाही़ त्यांच्याच सदस्यांना अध्यक्षा विश्वासात घेत नाहीत तर हे सदस्य त्यांना मदत तरी कशी करणार त्यामुळे या अशा प्रकारातून काहीही घडू शकते. -डॉ़ निलम पाटील, सदस्या, राष्टÑवादी काँग्रेस. 

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव