शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
2
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
3
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल
4
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
5
इन्स्टाग्राम मेसेजवरून भांडण पेटलं, पुण्यात शेजऱ्यानं तरुणाला दगडावर आपटून संपवलं! 
6
सईसोबत 'गुलकंद'मध्ये रोमान्स करणाऱ्या समीर चौघुले यांच्या बायको आणि मुलाला पाहिलंत का?
7
...अन् साथीदार गेला! नवरीच्या मांडीवर डोके ठेवून नवरदेवाने सोडले प्राण, महाराष्ट्रातील घटना
8
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
9
ताजमहालाजवळ ड्रायव्हरविना धावली कार, दोन पर्यटकांना चिरडले, धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल
10
Jalgaon Suicide: बारावीत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या, जळगावातील पाचोरा येथील घटना
11
कपूर कुटुंबाची सून अन् सुमित राघवनची बहीण आहे 'ही' मराठी अभिनेत्री, तुम्ही ओळखलंत का?
12
लक्षात ठेवा, नापास झाल्याने आयुष्य संपत नाही ! सचिन तेंडुलकर, नागराज मंजुळे झाले होते नापास
13
सोन्याच्या दरात मोठी घसरण, पाहा १० ग्रॅम सोनं खरेदी करायला किती खर्च करावा लागणार?
14
Video: हॉर्न वाजवण्यास रोखल्याने तो संतापला; सुरक्षा रक्षकाला थारखाली चिरडले...
15
Sensex २९५ आणि Nifty ११४ अंकांच्या तेजीसह बंद; 'या' शेअर्समध्ये मोठा चढ-उतार
16
रशियाचा भारताला पाठिंबा! 'पहलगामच्या गुन्हेगारांना सोडता कामा नये'; पुतिन यांचा पीएम मोदींना फोन
17
"ऋषभ पंतला पुन्हा फॉर्मात यायचे असेल तर त्याने धोनीला फोन करावा"; दिग्गज फलंदाजाचा सल्ला
18
Nashik Crime: तिन्ही कोयत्यांवर जाधव बंधूंच्या रक्ताचे डाग आहेत तसेच; महाजनच्या घरात सापडली शस्त्रे
19
Ather Energy IPO चं अलॉटमेंट 'असं' करा चेक, ग्रे मार्केट प्रीमिअम काय देतोय संकेत?
20
Women violence: देशात आपल्याच घरात महिलांचा होतोय छळ, आकडे बघा काय सांगताहेत?

ग्रा.पं. निवडणुकीत तालुक्यात भाजपा-सेना, राष्टÑवादीचे दावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 12:44 IST

मतमोजणी शांततेत

ठळक मुद्देनशिराबादला पोटनिवडणुकीत पं.स. सभापती पुत्राचा पराभव३ ग्रा.पं.मधील रिक्त जागा माघारीवेळीच बिनविरोधचार ग्रा.पं.साठी सार्वत्रिक तर ४ ग्रा.पं.तील रिक्त जागांसाठी झाली पोटनिवडणूक.

जळगाव: तालुक्यात चार ग्रा.पं.साठी सार्वत्रिक तर ४ ग्रा.पं.तील रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक झाली. त्यात चारही ग्रा.पं.वर भाजपा, राष्टÑवादी व सेनेचे वर्चस्व मिळविल्याचा दावा संबंधीतांनी केला आहे. तर ३ ग्रा.पं.मधील रिक्त जागा माघारीवेळीच बिनविरोध झाल्या होता.नंदगाव फेसर्डी, करंज धानोरे, बेळी व आमोदे बु.।। या चार ग्रा.पं.चा कार्यकाळ संपल्याने त्याच्या सरपंचपदासह सदस्यांच्या जागांसाठी सार्वत्रिक निवडणूक झाली. त्यात नंदगाव फेसर्डी ग्रा.पं.वर राष्टÑवादी, बेळी ग्रा.पं.वर भाजपाने दावा केला आहे. तर सेनेनेही वर्चस्व मिळविल्याचा दावा केला आहे. सकाळी १० वाजता तहसील कार्यालयाशेजारील तलाठी भवनमध्ये मतमोजणीस प्रारंभ झाला. त्यात तीन टेबल लावण्यात आले होते. एका टेबलवर एक ग्रामपंचायत याप्रमाणे मतमोजणी करण्यात आली. आधी सार्वत्रिक निवडणूक असलेल्या ग्रा.पं.ची व नंतर पोटनिवडणुकीची मतमोजणी झाली. मतमोजणी शांततेत पार पडली.नंदगाव फेसर्डीनंदगाव फेसर्डी ग्रा.पंच्या सरपंचपदी भूषण गुणवंतराव पवार (सर्वसाधारण)हे निवडून आले.तर सदस्यपदी विठ्ठल जंगलू भिल , लक्ष्मीबाई गोमा भिल , रिंकू चंद्रकांत पाटील, कैलास पुरमल भिल, कलाबाई वासुदेव कोळी, जिजाबाई शांताराम धनगर, धनराज सुरेश पाटील, दंगल हिरामण पाटील, कमल नगीन पाटील हे विजयी झाले.करंज धानोरे खुर्दकरंज धानोरे खुर्द गृप ग्रामपंचायतच्या सरपंचपदी भारती देवेंद्र पाटील (सर्वसाधारण स्त्री) निवडून आल्या आहेत. तर सदस्यपदी सुरेश चिंतामण सपकाळे, ललिताबाई बळीराम सपकाळे, छाया संजय सपकाळे, गोपाळ भागवत सपकाळे, जगदीश अशोक पाटील, महारू नामदेव भिल, सुश्मिता सागर कोळी हे सदस्य विजयी झाले. तर प्रभाग क्र.२ मधील अनुसूचित जमाती स्त्री पदासाठी राखीव दोन जागा उमेदवारांअभावी रिक्तच राहिल्या आहेत.बेळीबेळी ग्रामपंचायतच्या सरपंचपदी शालिनी अशोक भंगाळे (नामाप्र स्त्री) ह्या निवडून आल्या. तर सदस्यपदी संजय जंगलू सुर्वे, भारती रविंद्र नारखेडे, तुषार डिगंबर चौधरी, वर्षा संजय नारखेडे, रत्ना प्रकाश इंगळे, योगिता संजय नाले, भारती उत्तम बागडे हे विजयी झाले आहेत.आमोदे बु.।।आमोदे बु.।। ग्रामपंचायतच्या सरपंचपदी अर्चना विकास सूर्यवंशी (नामाप्र स्त्री) यांची निवड करण्यात आली आहे. तर सदस्यपदी नानासाहेब जयवंतराव सूर्यवंशी, ललिता उदय पाटील, रंजना चुनीलाल धनगर, सुधाकर हेमलाल सूर्यवंशी,वत्सलाबाई लक्ष्मण पाटील, मनिषा दीपक सूर्यवंशी, प्रमिलाबाई भास्कर गायकवाड, बाळू माणिक अहिरे, शांताराम सुका भिल हे विजयी झाले आहेत.पोटनिवडणुकभादली सरपंचपदी प्रभाकर सोनवणेभादली खुर्द ग्रामपंचायतच्या सरपंचपदासाठी पोटनिवडणूक झाली. त्यात प्रभाकर बाबूलाल सोनवणे यांची यापूर्वीच बिनविरोध निवड झाली आहे. तसेच प्रभाग क्र.३ मधील अनुसूचीत जमाती स्त्री राखीव जागेवर सुनिता तुषार सोनवणे, तर अनुसूचित जमाती राखीव जागेवर जगदीश जनार्दन सोनवणे हे पूर्वीच बिनविरोध निवडून आले आहेत.सुजदेसुजदे ग्रा.पं.च्या प्रभाग ३ मधील नामाप्र स्त्री राखीव जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत हेमलता नितीन सोनवणे या पूर्वीच बिनविरोध झाल्या आहेत.रिधूररिधूर ग्रा.पं.च्या प्रभाग ३ मधील अनुसूचीत जमातीच्या जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत विनोद दामू सोनवणे विजयी झाले.कुसुंबे खुर्दकुसुंबे खुर्द ग्रा.पं.च्या प्रभाग १ मधील रिक्त जागेसाठी निवडणूक झाली. त्यात बापूराव देवराम पाटील हे २३६ मते मिळवून विजयी झाले. तर त्यांना विजय भिमसिंग पाटील यांनी २१३ मते मिळवत चांगली टक्कर दिली.असोदाअसोदा ग्रा.पं.च्या प्रभाग १ मधील सर्वसाधारण स्त्री राखीव जागेसाठी निवडणूक झाली. त्यात मंगला विजय भोळे ह्या ४९३ मते मिळवून विजयी झाल्या. त्यांना सुरेखा जीवन सोनवणे यांनी ४४२ मते मिळवित चांगली लढत दिली. तर प्रभाग ५ मधील नामाप्र स्त्री राखीव जागेसाठी निवडणूक झाली. त्यात मंदाकिनी सुनील पाटील ह्या ५५९ मते मिळवून विजयी झाल्या.शिरसोली प्र.बो.शिरसोली प्र.बो. ग्रा.पं.च्या प्रभाग ४ मधील रिक्तजागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत निळकंठ पंढरीनाथ काटोले हे ५५१ पैकी ५१८ मते मिळवून विजयी झाले.नशिराबादला पोटनिवडणुकीत प्रदीप साळी, कविता रंधे विजयीनशिराबाद ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत चुरशीच्या लढतीत पंचायत समितीचे सभापती यमुनाबाई दगडू रोटे यांचा पुत्र राजेंद्र रोटे यांचा २८९ मतांनी प्रदीप अनिल साळी यांनी पराभव केला. तर महिला राखीव जागेवर कविता विनोद रंधे यांनी विजय मिळविला. विजयोत्सवानिमित्त समर्थकांनी गुलालाची उधळण करीत ढोल-ताशाच्या गजरात मिरवणूक काढून जल्लोष साजरा केला.ग्रामपंचायतीच्या दोन जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत ८ उमेदवार रिंगणात होते. त्यात सामाजिक कार्यकर्ते प्रदीप अनिल साळी यांना ६१८ मतांनी विजय झाला. संदीप रमेश माळी यांना (५६५), राहुल रघुनाथ नारखेडे (४५३), पंचायत समितीचे सभापती यमूनाबाई रोटे यांचे पुत्र राजेंद्र रोटे यांना (३२९) मते मिळाली. दरम्यान, महिला राखीव जागेवर माजी ग्रामपंचायत सदस्य विनोद रंधे यांच्या पत्नी कविता रंधे यांचा ६५९ मतांन दणदणीत विजय झाला.सुनीता दत्तात्रय सोनटक्के (५०५), मनिषा दीपक सोनवणे (५०४), सुमन नितीन बेंडवाल (२७८) यांना मते मिळाली. पोटनिवडणुकीत ६१ मतदारांनी उमेदवार पात्र नाही असे मतदान केले. निवडणूक अधिकारी योगेश नन्नवरे, तलाठी यु.बी.निंबाळकर होते.दरम्यान, विजयी मिरवणुकीत समर्थकांनी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला. कविता रंधे यांच्या विजयी रॅलीत सरपंच विकास पाटील, उपसरपंच किर्तीकांत चौबे, माजी सरपंच पंकज महाजन, अरुण भोई, नजीरअली आदी उपस्थित होते. प्रदीप साळी यांच्या विजयी नागरिक, मित्रपरिवार मोठ्या संख्येने होता.पोटनिवडणूक असली तरी ही निवडणूक राजकीयदृष्ट्या महत्त्वाची ठरणारी होती. त्यामुळे प्रमुख राजकीय पक्षांच्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी चांगलीच कंबर कसली होती. मात्र त्यात मतदार राजाने कही खुशी कही गमचा अनुभव पदरात दिल्याने अस्तित्वाच्या लढतीत निराशादायी ठरल्या. (वार्ताहर)

टॅग्स :JalgaonजळगावElectionनिवडणूक