शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

भाजपने चकीत केले! विधानसभेतील बंडखोर उमेदवारांना दिली निवडणुकीची जबाबदारी

By ajay.patil | Updated: June 8, 2023 17:12 IST

अत्तरदे, शिंदेवर जळगाव ग्रामीण, पाचोऱ्याच जबाबदारी : डॉ.राधेश्याम चौधरी, नंदकुमार महाजनांवर लोकसभेची जबाबदारी

जळगाव - आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आपली तयारी सुरु केली असून, गुरुवारी भाजपकडून लोकसभा व विधानसभानिहाय निवडणूक प्रमुखांची नियुक्ती करण्यात आली आहे. २०१९ च्या निवडणुकीत जळगाव ग्रामीण मतदारसंघात बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी करणाऱ्या चंद्रशेखर अत्तरदे व पाचोऱ्यातून उमेदवारी करणाऱ्या अमोल शिंदे यांच्यावर त्या-त्या मतदारसंघाच्या निवडणुकीची जबाबदारी दिली आहे.

त्यामुळे शिवसेना शिंदे गटातील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यातच ज्या मतदारसंघात सध्यस्थितीत शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहेत. त्या ठिकाणी भाजपने विधानसभेच्या निवडणुकीसाठी निवडणूक प्रमुख नेमले आहेत. त्यामुळे भाजप स्वबळावरच निवडणूक लढवेल का ? असा प्रश्न निर्माण होत आहे. जर मुक्ताईनगर, जळगाव ग्रामीण, एरंडोल, पाचोरा, चोपडा या जागा भाजपचा मित्र पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाकडे आहेत. तर मग या मतदारसंघासाठी निवडणूक प्रमुख नियुक्ती करण्याची गरज काय ? असा ही प्रश्न आता अनेकांकडून उपस्थित होण्याची शक्यता आहे. भाजपकडून  मुंबई येथे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लोकसभा मतदारसंघ व विधानसभा मतदारसंघ निहाय निवडणूक प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.

डॉ.चौधरींवर जळगाव तर महाजनांवर रावेर लोकसभेची जबाबदारीलोकसभेच्या निवडणुका अवघ्या ८ महिन्यांवर आल्या आहेत. त्यासाठी भाजपने लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक प्रमुखांची नियुक्ती केली आहे. त्यात भाजप प्रदेश कार्यकारणीचे सदस्य डॉ.राधेश्याम चौधरी  यांची जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी तर जि.प.चे माजी उपाध्यक्ष नंदकुमार महाजन यांची व रावेर लोकसभा मतदारसंघ निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ.राधेश्याम चौधरी यांना भाजपने गेल्या महिनाभरातच दुसरी महत्वाची जबाबदारी दिली आहे. तर नंदकुमार महाजन यांचाही भाजपने संघटनेत सहभाग करून घेतला आहे.

जिल्हाध्यक्ष निवडीकडे लागले लक्षभाजपने लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या प्रमुखांच्या नियुक्त्या केल्या असल्या, तरी जिल्हाध्यक्ष व महानगराध्यक्ष पदाची अद्याप घोषणा केलेली नाही. त्यामुळे आता पक्षाकडून जिल्हाध्यक्षपदी कोणाची वर्णी लागते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  

-लोकसभेची जबाबदारीजळगाव लोकसभा - डॉ.राधेश्याम चौधरीरावेर लोकसभा - नंदकुमार महाजन

-विधानसभा निवडणूक प्रमुखचोपडा - गोविंद शेंगदाणेरावेर - अमोल जावळेभुसावळ - संजय पाटीलजळगाव शहर - विशाल त्रिपाठीजळगाव ग्रामीण - चंद्रशेखर अत्तरदेअमळनेर - स्मिता वाघएरंडोल - करण पवारचाळीसगाव - भुवनेश्वर पाटीलपाचोरा - अमोल शिंदेजामनेर - चंद्रकांत बाविस्करमुक्ताईनगर - अशोक कांडेलकर

टॅग्स :BJPभाजपा