शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
2
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
3
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
4
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
5
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
6
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
7
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
8
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
9
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
10
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
11
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
12
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
13
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
14
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
15
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
16
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
17
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
18
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
19
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
20
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास

शेंदुर्णी न.प.निवडणूक : भाजप विरोधकांना चपराक, मतदारांची विकासाला साथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 17:01 IST

शेंदुर्णी नगरपंचायत निवडणुकीचा निकाल भाजप विरोधात सर्व शक्तिनीशी एकत्र आलेल्या कॉंग्रेस व राष्ट्रवादी आघाडी सह शिवसेना व मनसेसाठी अतिशय धक्कादायक आहे. मतदारांनी भरघोस मतदान करुन जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांचेवर विश्वास व्यक्त केला आहे.

ठळक मुद्देशेंदुर्णीची निवडणूक विधानसभेची ट्रेलरशिवसेना व मनसेसाठी धक्कादायक निकालभाजपा विरोधात सर्व पक्ष अशी स्थिती तरीही विजय

मोहन सारस्वतजामनेर : शेंदुर्णी नगरपंचायत निवडणुकीचा निकाल भाजप विरोधात सर्व शक्तिनीशी एकत्र आलेल्या कॉंग्रेस व राष्ट्रवादी आघाडी सह शिवसेना व मनसेसाठी अतिशय धक्कादायक आहे. मतदारांनी भरघोस मतदान करुन जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांचेवर विश्वास व्यक्त केला आहे.शेंदुर्णीच्या लढतीकडे विधानसभेची ट्रेलर म्हणुन पाहिले गेले. पाच वर्षापूर्वी ग्रामपंचायतीत भाजप बहुमतात आल्यानंतर झालेल्या निवडणुकीत शेंदुर्णीतील मतदारांनी पंचायत समितीसाठी व जिल्हापरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांना निवडुन दिले होते. याची आठवण काही कार्यकर्ते यावेळी करुन देतात. यानंतर अवघ्या दोन वर्षानंतर शहरातील मतदारांचा बदललेला कौल निर्णायक मानावा लागेल.भाजपच्या नेतृत्वाखालील ग्रा.पं.च्या कारभारातील उणे दुणे विरोधकांनी प्रचाराच्या माध्यमातून मतदारांसमोर ठेवली. झालेली कामे निकृष्ट दर्जाची असल्याचा आरोप केला. भाजपने देखील त्याला जशास तसे उत्तर देऊन आपली बाजू मांडली. या आरोप प्रत्यारोपात मतदारांनी मात्र आपला कौल भाजपला दिल्याने त्यांचा विकासावर व जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी दिलेल्या शब्दावर विश्वास असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले.भाजपकडुन पैशांचा मोठा वापर झाला व पराभवास ईव्हीएम जबाबदार असल्याचे विरोधक म्हणतात, यात सत्य किती व असत्य किती हा वादाचा व संशोधनाचा विषय आहे. लोकशाही मार्गाने मतदारांनी दिलेला कौल सर्वांनीच मान्य केला पाहिजे.या निवडणुकीत प्रथमच शिवसेना व मनसे स्वबळावर लढल्याने त्यांचे पक्षचिन्ह मतदारांपर्यंत पोहचले. निवडणुकीतील जय, पराजय हे पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शक ठरत असल्याने पराभवाची चिंता न करता नव्या उमेदीने वाटचाल करण्याचा संदेश मतदारांनी त्यांना दिला आहे. शिवसेनेची आक्रमकता व आमदार किशोर पाटील यांची मंत्री महाजन विरोधी भूमिका शेंदुर्णीच्या माध्यमातुन समोर आली.भाजपने शेंदुर्णीकरांना दिलेली आश्वासने पुर्ण करण्याची जबाबदारी पहिल्या लोकनियुक्त नगराध्यक्षा विजया खलसे व त्यांच्या सहकारी नगरसेवकांची आहे. पाणी, आरोग्य या मुलभुत सुविधा मतदारांना पाहिजे, त्या पुरविण्याची हमी भाजपने घ्यावी.नगरपंचायतीत राष्ट्रवादी, कॉंग्रेस आघाडीच्या चार नगरसेवकांना जागल्याची भुमीका घ्यावी लागेल. सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवुन विकास कामे करवून घेण्याची जबाबदारी त्यांची आहे. निवडणुक प्रचारातील कटुता विसरुन शहरासाठी एकत्रित काम करण्याची संधी मिळाली असल्याने त्याचे सोने करावे अशी नागरीकांची अपेक्षा आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकJamnerजामनेरGirish Mahajanगिरीश महाजनBJPभाजपाShiv Senaशिवसेना