शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवार गटाला मोठा धक्का; एकनाथ खडसे करणार घरवापसी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2024 06:30 IST

शरद पवार गटाला मोठा धक्का

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव : भाजपमध्ये जाण्याचे तूर्तास प्रयोजन नाही, असे सांगणारे शरद पवार गटाचे नेते व आमदार एकनाथ खडसे यांनी लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे शनिवारी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. दरम्यान, खडसे यांच्या भाजप प्रवेशाच्या निर्णयामुळे शरद पवार गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसे हे खासदार रक्षा खडसे यांच्यासोबत दिल्ली येथे गेले होते. यावेळी गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत त्यांची बैठक झाली. त्यावेळी खडसे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा होती. मात्र, त्यास खडसेंनी नकार दिला. आता मात्र त्यांनी स्वत:च भाजपमध्ये प्रवेश करीत असल्याचे सांगितले. गौणखनिज प्रकरणी एकनाथ खडसे व कुटुंबाला १३७ कोटींचा दंड ठोठावला होता. नुकताच हा निर्णय शासनाने रद्द केला. भाजपकडून रक्षा खडसे यांच्या उमेदवारीला विरोध होत असताना आपण शरद पवार गटाकडून लोकसभा लढणार असल्याचे एकनाथ खडसे यांनी जाहीर केले होते. मात्र, रक्षा यांना भाजपने उमेदवारी घोषित केल्यानंतर खडसे यांनी प्रकृतीचे कारण सांगत निवडणुकीतून माघार घेतल्याने त्यांच्या भाजपमधील प्रवेशाच्या चर्चेने जोर धरला होता.

रोहिणी खडसे मात्र शरद पवार गटातच nएकनाथ खडसे हे भाजपमध्ये प्रवेश करणार असले, तरी त्यांच्या कन्या व शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा ॲड. रोहिणी खडसे मात्र शरद पवार गटामध्येच राहणार आहेत. याबाबतची माहिती त्यांनी दिली.nखडसेंच्या भाजप प्रवेशामुळे रोहिणी यांच्या भूमिकेबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र त्यांनी शरद पवार गटातच राहणार असल्याचे स्पष्ट केले.

भाजपतील प्रवेशाची बातमी खरी आहे. लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. अजून प्रवेश झालेला नसल्यामुळे विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला नाही.- एकनाथ खडसे,आमदार, शरद पवार गट 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारeknath khadseएकनाथ खडसे