शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
2
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
3
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
4
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
5
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
6
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
7
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
8
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
9
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
10
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
11
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
12
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
13
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
14
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
15
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
16
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
17
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
18
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
19
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
20
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळात अभिवाचन स्पर्धेत विद्यार्थ्यांनी घडवले शिवरायांचे दर्शन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 15:08 IST

इयत्ता चौथीच्या शिवछत्रपती या पाठ्यपुस्तकावर आधारित ही स्पर्धा चार गटात पार पडली. 

ठळक मुद्देसंस्कृती गांधेले, प्रणिता पाटील, गौरी हलपतराव व श्रद्धा साळवे ठरले प्रथमइयत्ता चौथीच्या शिवछत्रपती या पाठ्यपुस्तकावर आधारित चार गटात पार पडली ही स्पर्धा

भुसावळ : येथील मराठा समाजातर्फे आयोजित शिवछत्रपती अभिवाचन स्पर्धेत पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या अभिवाचन सादरीकरणातून छत्रपती शिवाजी महाराज यांचे सांगोपांग दर्शन घडवले. इयत्ता चौथीच्या शिवछत्रपती या पाठ्यपुस्तकावर आधारित ही स्पर्धा चार गटात पार पडली. व्यासपीठावर माजी शिक्षण सभापती राजेंद्र आवटे, प्राथमिक शिक्षण सभापती ॲड.तुषार पाटील, श्री गाडगेबाबा हायस्कूलचे मुख्याध्यापक अरूण धनपाल, मराठा समाज मंडळाचे सहसचिव योगेश जाधव उपस्थित होते. डॉ.जगदीश पाटील यांनी प्रास्ताविक केले.सूत्रसंचालन स्पर्धा समन्वयक डी.के.पाटील यांनी केले. स्पर्धेदरम्यान गटशिक्षणाधिकारी तुषार प्रधान, शिक्षण सभापती मुकेश गुंजाळ व उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले.या अभिनव व नावीन्यपूर्ण स्पर्धेत सुमारे सव्वाशे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांना मास्क वाटप करण्यात आले.स्पर्धेत परीक्षक म्हणून प्रा.आर. एच. पाटील, मुख्याध्यापक ए. आर. धनपाल, नाट्यकर्मी वीरेंद्र पाटील, डॉ.अनिल पाटील, मनीषा पाटील, जे. बी.पाटील, दीपक वारांगणे व मीरा जंगले यांनी काम पाहिले. यशस्वीतेसाठी मराठा समाज मंडळाचे अध्यक्ष किरण पाटील, सहसचिव योगेश जाधव, स्पर्धा समन्वयक डी. के. पाटील, डॉ.जगदीश पाटील यांच्यासह विजय कलापुरे, कृष्णा शिंदे, सुमित देसले, वैभव गुंजाळ, राहुल पाटील, सचिन पाटील, प्रफुल्ल पन्हाळकर आदींनी परिश्रम घेतले. विजेते असे -पाचवी व सहावीच्या पहिल्या गटात प्रथम संस्कृती योगेश गांधेले (रा. धो. हायस्कूल कुऱ्हे पानाचे), द्वितीय आर्या श्याम निकम (सेंट अलॉयसियस हायस्कूल), तृतीय नम्रता अभय सूर्यवंशी (सेंट अलॉयसियस हायस्कूल). सातवी व आठवीच्या दुसऱ्या गटात प्रथम प्रणिता संदीप पाटील (कोटेचा हायस्कूल), द्वितीय उर्वशी विजय कोळी (कोटेचा हायस्कूल), तृतीय स्नेहल संदीप इंगळे (ज्ञानज्योती विद्यालय खडके). नववी व दहावीच्या तिसर्‍या गटात प्रथम गौरी सुभाष हलपतराव (सेंट अलॉयसियस हायस्कूल), द्वितीय सौरभ विकास वाणी (महाराणा प्रताप हायस्कूल), तृतीय प्रेरणा अभय सूर्यवंशी (कोटेचा हायस्कूल). अकरावी व बारावीच्या चौथ्या गटात प्रथम श्रद्धा अनिल साळवे (सु. ग. टेमानी ज्युनियर कॉलेज), मेहवीश शेख युनुस (सु. ग. टेमानी ज्युनियर कॉलेज), तृतीय खुशी अनंतकुमार वरणकर (के.नारखेडे ज्युनियर कॉलेज). या विजेत्या स्पर्धकांना शिवजयंतीनिमित्त आयोजित समारंभात शिवव्याख्याते शेख सुभान अली, शिक्षण सभापती मुकेश गुंजाळ, मराठा समाज अध्यक्ष किरण पाटील, श्रीगाडगेबाबा हायस्कूलचे मुख्याध्यापक अरुण धनपाल व महिला पदाधिकारी अलका भगत या मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले.

टॅग्स :Educationशिक्षणBhusawalभुसावळ