शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

भुसावळचा नवरदेव लग्नाआधीच गायब झाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 19:38 IST

नाशिक पोलिसात नोंद : पत्रिका वाटायला गेला अन् गायब झाला

ठळक मुद्देनाशिक येथील भद्रकाली पोलीस स्टेशनला हरविल्याची नोंदकाही दिवसांवर लग्न सोहळा येऊन ठेपल्याने नातेवाइकांकडून शोधाशोधनवरदेव समाधान हा ‘महावितरण’मध्ये नोकरीला

आॅनलाईन लोकमतजळगाव,दि.२४ : नाशिक येथे स्वत:च्या लग्नाची पत्रिका वाटायला गेलेला भुसावळ येथील नवरदेव बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. समाधान भास्कर बुगले (वय २८, रा.खडका, भुसावळ) असे या नवरदेवाचे नाव आहे. याप्रकरणी नाशिक येथील भद्रकाली पोलीस स्टेशनला हरविल्याची नोंद झाली आहे.याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, भुसावळ येथील खडका परिसरात राहणारा समाधान याचे २८ एप्रिल रोजी लग्न ठरले आहे. नाशिक शहरातील राजीवनगरात राहणाऱ्या आतेबहिणीस लग्नाची पत्रिका देण्यासाठी १८ एप्रिल रोजी गेला होता. धुळे शहरातील चाळीसगाव फाटा येथून धुळे-नाशिक बायपास बसने तो द्वारकानगरात उतरला. तत्पूर्वी त्याने या बहिणीला फोन करून माहिती दिली होती. मात्र नंतर त्याचा संपर्कच झाला नाही. त्याच्याकडे असलेले दोन्ही मोबाइल क्रमांक बंद होते.अवघ्या काही दिवसांवर लग्न सोहळा येऊन ठेपल्याने नातेवाइकांनी त्याची शोधाशोध केली. तपास न लागल्याने शेवटी आतेबहीण मनीषा श्रीराम महाजन (वय ३८, रा. राजीवनगर, नाशिक) यांनी नाशिक भद्रकाली पोलीस ठाण्यात हरविल्याची तक्रार दिली. अजूनही त्याचा शोध लागला नाही.समाधान हा ‘महावितरण’मध्ये नोकरीला आहे. लग्नाची सर्व तयारी झालेली असताना नवरदेव गायब झाल्याने नवरदेव व नवरीकडील नातेवाईक मंडळी चिंतेत आहेत.पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्याचे काही दिवसांपूर्वीचे लोकेशन चाळीसगाव आले होते. मात्र मोबाइलच बंद असल्याने चिंता वाढली आहे, दुसरीकडे लग्नाची सर्व तयारी झालेली आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव