भुसावळ : माजी आमदार नीळकंठ चिंतामण फालक यांच्यासह अन्य दोघांनी प्लॉटमधील बांधकामावरून मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप नितीन प्रभाकर पाटील (३९) यांनी केला आहे. दरम्यान, हा आरोप खोटा असल्याचे नीळकंठ फालक यांचे म्हणणे आहे.याबाबतची फिर्याद नितीन पाटील यांनी दिली आहे. त्यावरून बाजारपेठ पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा म्हणून नोंद घेण्यात आली आहे. नितीन पाटील (रा.वरणगाव फॅक्टरी) हे वरणगाव फॅक्टरी येथे नोकरीस असून, त्यांचा भुसावळमध्ये बंब कॉलनीत प्लॉट आहे. या प्लॉटचे ते बांधकाम करीत आहे. मात्र हा प्लॉट मोजणीमध्ये माझा असल्याचा दावा माजी आमदार फालक यांनी केला व त्यांच्यासह जितेंद्र पाटील व त्यांचे भाऊ (पूर्ण नाव गाव माहीत नाही) यांनी बांधकाम करण्यास रोखले व मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली, अशी फिर्याद पाटील यांनी पोलिसात दिली आहे.आरोप खोटा- नीळकंठ फालकदरम्यान, माजी आमदार नीळकंठ मालक यांच्याशी संपर्क केला असता, तो प्लॉट मोजणीमध्ये माझ्या हद्दीत आहे, त्यासंदर्भात न्यायालयात प्रकरण प्रलंबित आहे. तरीही नितीन पाटील दादागिरी करून बांधकाम करीत होते. त्या बांधकामास विरोध केल्यामुळे खोटी फिर्याद दिली.
भुसावळात माजी आमदार नीळकंठ फालक यांच्याकडून एकास मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2018 16:10 IST
माजी आमदार नीळकंठ चिंतामण फालक यांच्यासह अन्य दोघांनी प्लॉटमधील बांधकामावरून मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप नितीन प्रभाकर पाटील (३९) यांनी केला आहे.
भुसावळात माजी आमदार नीळकंठ फालक यांच्याकडून एकास मारहाण
ठळक मुद्देप्लॉट बांधकामावरून जीवे मारण्याची दिली धमकीमाजी आमदारांनी फेटाळला आरोपभुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद