बीएचआरचे अवसायक आज स्वीकारणार पदभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:17 AM2021-03-08T04:17:11+5:302021-03-08T04:17:11+5:30

जळगाव : भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे नवे अवसायक म्हणून चैतन्य नासरे हे सोमवारी पदभार स्वीकारणार आहे. ...

BHR's incumbent will assume office today | बीएचआरचे अवसायक आज स्वीकारणार पदभार

बीएचआरचे अवसायक आज स्वीकारणार पदभार

Next

जळगाव : भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे नवे अवसायक म्हणून चैतन्य नासरे हे सोमवारी पदभार स्वीकारणार आहे. बीएचआरचे या आधीचे अवसायक जितेंद्र कंडारे यांच्यासह इतरांवर आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केली. त्यानंतर हे पद रिक्तच होते. जानेवारी महिन्यात कंडारे यांची मुदत संपण्याच्या काही दिवस आधी केंद्र सरकारने नासरे यांची नियुक्ती केली, मात्र नासरे यांना राज्य सरकारने अद्याप मुक्त केले नव्हते. त्यामुळे ते रुजू होऊ शकले नव्हते. आता नासरे रुजू होणार आहेत.

नासरे हे हिंगणा, जि. नागपूर येथे सहायक निबंधक म्हणून कार्यरत होते. त्यांनी या आधी समता सहकारी बँक, नागपूरचे मुख्य अवसायक, आणि द नागपूर महिला नागरी सहकारी बँकेच्या अवसायक बोर्डाचे चेअरमन म्हणून काम पाहिले आहे.

Web Title: BHR's incumbent will assume office today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.