जळगाव : भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टी क्रेडिट को-ऑप सोसायटी सध्या नव्या अवसायकाच्या प्रतीक्षेत आहे. बीएचआरचे नवे अवसायक म्हणून चैतन्य नासरे यांची नियुक्ती केंद्र शासनाने केली आहे. मात्र राज्याच्या सहकार खात्याने अद्यापही त्यांची मूळ पदावरून मुक्तता केलेली नाही. त्यामुळे ते अद्याप या पदावर रुजू होऊ शकलेले नाही.
नासरे हे सध्या हिंगणा, जि. नागपूर येथे सहायक निबंधक म्हणून कार्यरत आहेत. केंद्र शासनाच्या कृषी आणि सहकार विभागाने त्यांची नियुक्ती केल्याचे पत्र १८ जानेेवारीलाच पाठवले होते. मात्र त्यांच्याकडे हिंगणा, जि. नागपूर येथील पदभार देखील आहे. त्यामुळे राज्य शासनाने त्यांना या पदावरून मुक्त केल्याशिवाय ते बीएचआरच्या अवसायकपदावर येऊ शकत नाही. त्यामुळे बीएचआरच्या ठेवीदारांना नव्या अवसायकाची प्रतीक्षा आहे.