शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

‘भेंडी’ला फोडांचा आजार उत्पादक होताय बेजार! वातावरण बदलाची बाधा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2024 16:42 IST

उत्पादनानात घट येत आवक झाली कमी

कुंदन पाटील

जळगाव : वातावरण बदलामुळे रब्बी हंगामातील फोड येत असल्याने भेंडीच्या उत्पादनात मोठी घट निर्माण होत आहे. त्यामुळे उत्पादकांना भेंडी नकोशी वाटायला लागली आहे.

यंदाच्या रब्बी हंगामात भेंडीची मोठ्या प्रमाणावर लागवड झाली आहे. ही भेंडी वाढ होतानाच वेडीवाकळी होत असल्याचे उत्पादकांच्या ध्यानात आले. त्यानंतर त्यांनी तज्ज्ञांशी बोलून आवश्यक औषधांची फवारणीही केली. मात्र वाढ होत असलेल्या भेंडीवर फोड येत गेले. तोडणी केल्यानंतर ही फोडयुक्त भेंडीचे प्रमाण जास्त असल्याचे स्पष्ट झाले आणि त्यानंतर उत्पादकांनी भेंडीची छाटणी करुन बाजारात न्यायला सुरुवात केली आहे. लागवड, पोषण, औषध फवारणी आणि तोडणीचा खर्च अवाक्याबाहेर जात असतानाच आता भेंडी छाटणीचा भार अंगावर आला आहे. त्यामुळे उत्पादक मोठ्या कोंडीत सापडला आहे.

आवक घसरली

बाजारात भेंडीची आवक मोठ्या प्रमाणावर घसरली आहे. फोडयुक्त भेंडीकडे ग्राहकांनी पाठ फिरविली आहे. त्यामुळे अत्यल्प प्रमाणात येणाऱ्या चांगल्या दर्जाची भेंडी आता ८० रुपये प्रतिकिलोचा भाव घेऊन बसली आहे.यंदा ‘फोड्या’ची भेंडीवर मोठ्या प्रमाणावर लागण झाली आहे. पर्यायी औषधी फवारल्यावरही उपयोग झालेला नाही.  सर्वसामान्य शेतकऱ्यांना पर्यायही सापडत नसल्याने यंदा भेंडीने आर्थिक गणित बिघडविले आहे.

-संदीप माळी,उत्पादक मोरफळ (पारोळा)

वातावरणात कमालीचा बदत होत आहे. त्यामुळे भेंडींची वेडीवाकडी वाढ होणे, वाढ खुटणे, फोड येणे, डाग पडणे आदी लक्षणे दिसून येत आहेत. या उपायायेजना म्हणून संशोधकांच्या मदतीनेच पर्याय शोधावा.-डॉ.व्ही.टी.पाटील, वरिष्ठ भाजीपाला पैदासकार, म.फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.