शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
2
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
3
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
4
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
5
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
6
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
7
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
8
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
9
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
10
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
11
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
12
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
13
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
14
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
15
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
16
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
17
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
18
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
19
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
20
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  

भवरलाल जैन यांची तिसरी पिढी उद्योगात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 12:49 IST

- विजयकुमार सैतवाल ऋषभदेवांनी दिलेली कृषिसंस्कृती कृतिशीलपणे आचरणात आणणाऱ्या भवरलाल जैन यांची शेतीमातीशी असणारी निष्ठा सर्वश्रुत आहे. कृषी संस्कृतीचा ...

- विजयकुमार सैतवालऋषभदेवांनी दिलेली कृषिसंस्कृती कृतिशीलपणे आचरणात आणणाऱ्या भवरलाल जैन यांची शेतीमातीशी असणारी निष्ठा सर्वश्रुत आहे. कृषी संस्कृतीचा वसा त्यांनी घेतला. हा वसा त्यांची पुढची पिढी समर्थपणे चालवित आहेत. सुपुत्र अशोक, अनिल, अजित व अतुल हे भवरलाल जैन यांनी संस्कारित केलेल्या कार्यसंस्कृतीनुसार या समूहाची धुरा समर्थपणे सांभाळत आहेत. भवरलाल जैन यांच्या सहवासात संस्कारित झालेली नातवंडे तिसरी पिढीही प्रेरणा घेत आहे. बालपणापासूनच आपले आजोबा, वडील व काकांची धडपड तिसºया पिढीने पाहिलेली आहे.मायमातीसाठी प्रामाणिकपणे आयुष्यभर कठोर परिश्रम करणारे भवरलाल जैन यांनी शेती, शेतकरी व पाणी या तीन गोष्टींवर आपले लक्ष्य केंद्रीत केले. १८९७ मध्ये राजस्थानातील मारवाड- आगोळाई येथून पाण्याच्या शोधात हिरालाल जैन यांचे आजोबा जवाहरमल जैन स्थलांतरीत होऊन अजिंठ्याच्या पायथ्याशी असलेल्या वाकोद येथे आले व तेथेच ते स्थिरावले. पूर्वजांकडून कठोर परिश्रम, प्रामाणिकपणा आणि जिद्द ही परंपरा कायम ठेवत पाण्याचे मोल भवरलाल जैन यांनी जाणले होते. ‘जल हेच जीवन आणि जीवन हेच जल’ हाच ध्यास त्यांना लागला होता. त्याच कळकळीतून त्यांनी पाण्याचे व्यवस्थापन-संवर्धन केले. पाण्याचा काटकसरीने वापर कसा करावा त्या दृष्टीने जे काही करता येईल ते सर्व त्यांनी केले. तोच संस्कार आपल्या सहकाºयांनाही त्यांनी दिला. आईचा शब्द भाऊंनी जीव की प्राण मानल्यामुळे पिकपाण्याशी रुजलेले नाते वैश्विक पातळीवर केव्हा पोहोचले ते कळलेच नाही.जगातल्या शेती आणि शेती करण्याच्या अभ्यासानंतर भारतीय शेतीप्रणालीत ठिबक सिंचन कसे रुजविता येईल, त्या दृष्टीने आवश्यक ते बदल त्यांनी केले आणि शेतकºयांना जल बचतीचा शाश्वत मंत्र ठिबक सिंचनाच्या माध्यमातून त्यांनी दिला. त्यामुळे ‘ठिबक सिंचनाचे प्रणेते’ असलेल्या या जलसाधकाने कृषिक्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या कर्तृत्वाचा अमिट ठसा निर्माण केला.भवरलाल जैन यांनी २५ फेब्रुवारी २०१६ ला अखेरचा श्वास घेतला. कृषी संस्कृतीचा वसा चालविणारे भवरलाल जैन यांच्या पुढच्या पिढीनेही आपले कर्तृत्व सिद्ध केले. संपूर्ण जगभरात भारतासह एकूण ३३ कारखाने, १२६ हून देशांमध्ये २७०० वितरक विदेशात, भारतातील ७५०० वितरकांच्या माध्यमातून जैन इरिगेशनने निर्माण केलेली विविध उत्पादने वितरीत होत आहेत.अशोक जैनभवरलाल जैन यांचे ज्येष्ठ पुत्र अशोक जैन. त्यांनी जळगावच्या एम.जे. कॉलेजमधून वाणिज्य शाखेची पदवी संपादन केली. ते १९८३ पासून कंपनीत कार्यरत झाले. आज ते कंपनीचे अध्यक्ष आहेत.अनिल जैनभवरलाल जैन यांचे व्दितीय पुत्र अनिल जैन यांनी आपले मोठेभाऊ अशोक जैन यांच्या पाऊलावर पाऊल ठेवून वाणिज्य शाखेची पदवी संपादन केली. ते १९८४ पासून कंपनीत कार्यरत झाले. ते उपाध्यक्ष असून निर्यात, विदेशातील कंपन्यांचे काम, कंपन्यांचे अधिग्रहण, विस्तार अशा अनेक बाबी ते सांभाळतात.अजित जैनभवरलाल जैन यांचे तिसरे पुत्र अजित जैन यांनी तांत्रिक शाखेला प्राधान्य दिले. पुणे विद्यापीठातून त्यांनी बी.ई (मेकॅनिक) पदवी संपादन केली. ते १९८५ पासून कंपनीत कार्यरत झाले. कंपनीचे सहव्यवस्थापकीय संचालक ही जबाबदारी ते यशस्वी पार पाडत आहेत. अचूक निर्णयक्षमता, अखंड कार्यमग्नता हे त्यांचे वैशिष्ट्य आहे.अतुल जैनभवरलाल जैन यांचे चौथे पुत्र अतुल जैन यांनी पुणे येथे शिक्षण घेतले. पुणे विद्यापीठातून त्यांनी वाणिज्य विभागातील पदवी संपादन केली. ते १९९२ पासून कंपनीत कार्यरत झाले. कंपनीच्या विविध उत्पादनांच्या विपणन व्यवस्थेत त्यांचे मोलाचे योगदान आहे. कंपनीचे सहव्यवस्थापकीय संचालक ही जबाबदारी ते यशस्वी पार पाडत आहेत.अथांग अनिल जैनभवरलाल जैन यांचे नातू व अनिल जैन यांचा मोठा मुलगा अथांग जैन यांनी लंडन स्कूल आॅफ इकोनॉमिक्सची पदव्युत्तर शिक्षण २०१३ मध्ये पूर्ण केले. जैन इरिगेशनची उप कंपनी जैन फार्मफ्रेश फुडस् लि.चे संचालक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या संकल्पनेतून फ्रूट टू गो, फ्रोजन आमरस, जामून, स्ट्रॉबेरी, डिहायड्रेड आॅनियन (रेड एण्ड व्हाईट), व्हॅली स्पाईस हे नवीन उत्पादन बाजारात आणले गेले. आता व्हॅली स्पाईस मसाले उद्यागाची जबाबदारी देखील अथांग पार पाडत आहेत.अमोली अनिल जैनअनिल जैन व अनुभूती स्कूलच्या संचालिका निशा जैन यांची कन्या अमोली जैन यांनी लंडन स्कूल आॅफ इकोनॉमिक्स येथून २०१७ मध्ये आपले शिक्षण पूर्ण केले. कंपनीत ट्रेनी म्हणून त्यांनी अनुभव घेतला. आता जैन इरिगेशनची उप कंपनी जैन फार्मफ्रेश फुडस् लि.च्या रिटेलर डिव्हीजनची जबाबदारी त्यांच्यावर आहे.अभेद्य अजित जैनअजित जैन यांचा मोठा मुलगा अभेद्य जैन यांनी अलिकडेच किंग्ज कॉलेज लंडन येथे मास्टर इन इंटरनॅशनल माकेर्टींग पदवी मिळविली. ते ट्रेनी म्हणून कंपनीत कार्यरत आहेत.

टॅग्स :Jalgaonजळगाव